सन्मित्र ग्रंथालय

नमस्कार मित्रांनो,

आपल्या दहाव्या वर्षात पदार्पण करताना ब्लुमिंग्टन् नॉर्मल् मराठी मंडळ आणखीन एक दमदार आणि सकारात्मक पाऊल पुढे टाकत आहे. "सन्मित्र ग्रंथालय" - आपली स्वतःची सुमारे ५५० + मराठी पुस्तकांची लायब्ररी.

ग्रंथालयातील पुस्तकांची यादीसाठी येथे क्लिक करा.

सभासदत्वासाठी कृपया संपर्क साधा.

  • ग्रंथालय चालवण्यासाठी अर्थातच काही नियमांची आवश्यकता आहे, त्याविषयी इथे माहिती देत आहोतः
  • सभासदत्व- २० डॉलर वार्षिक + डिपॉझिट - ५ डॉलर - कॅश किंवा चेक चालेल.
  • ग्रंथालयाचे ठिकाण व वेळ - आर के ग्रोसरीज् - दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सायंकाळी ६ ते ८
  • ग्रंथालयातून एकावेळेला जास्तीत जास्त दोन पुस्तके घेता येतील.
  • पुस्तके आपल्याजवळ जास्तीत जास्त २ आठवडे ठेवता येतील. पुस्तके दोन आठवड्यांसाठी रिन्यू करता येतील.
  • पुस्तके ठरलेल्या वेळेत परत करण्यास उशीर झाल्यास आठवड्यास $०.२५ दंड आकारण्यात येईल.
  • प्रत्येक सभासदाला एक सभासदपत्र (library card) देण्यात येईल. ग्रंथालयाच्या भेटीत ते सभासदपत्र घेऊन यावे लागेल.
  • पुस्तक हरवल्यास अभवा खराब झाल्यास ५ डॉलर दंड आकारण्यात येईल.
  • स्थळ - आर्. के. इंडीयन ग्रोसरीज् - १०६ यंग ड्राईव्ह, नॉर्मल, इलिनॉय ६१७६१

अधिक माहितीसाठी संपर्क साधावाः सौ. गौरी करंदीकर; - ३०९-६६१-१०३४

आपल्याकडे ग्रंथालयाला देणगी देण्यासाठी काही पुस्तके असल्यास जरूर संपर्क साधावा. मंडळ आनंदाने त्यांचा ग्रंथालयात समावेश करेल.

ग्रंथालयात काम करण्यासाठी मंडळास अर्थातच स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. आपणास मदत करायची इच्छा असल्यास कृपया सौ. गौरी करंदीकर यांच्याशी संपर्क साधावा.

आपले
ब्लुमिंग्टन् नॉर्मल् मराठी मंडळ