संक्रांत २०१७


नमस्कार मंडळी,

शनिवार दिनांक २१ जानेवारी २०१७ रोजी हिंदू टेम्पल ऑफ ब्लूमिंग्टन -नॉर्मल (HTBN) मध्ये मराठी मंडळाचा संक्रांती चा कार्यक्रम साजरा झाला.

गरमागरम कॉफी आणि तिळाच्या वडीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. महिलांना हळदी कुंकू आणि वाण म्हणून पर्स मिरर दिले लहान मुलांसाठी बोरनहाण,आयोजित केले होते, हलव्याचे दागिने घातलेले बालगोपाळ फारच गोंडस दिसत होते.

त्यानंतर सादर झाले धमाल स्किट आणि सुरेल गाणी, : सीमा बेंद्रे, अनंत गोखले, वसुधा भालेराव,वल्लरी जोशी आणि अवधूत नाडकर्णी यांनी "यमन" रागावर आधारित गाण्यांची सुंदर medley सादर केली

प्रत्येक मराठी कुटुंबाचे ब्लूमिंग्टन च्या मराठी मंडळाशी एक वेगळेच नाते तयार होते आणि तो ऋणानुबंध ब्लूमिंग्टन सोडून गेल्यावरही अतूट रहातो हा सगळ्यांचाच अनुभव यंदा "ब्लूमगावचे शहाणे" या स्किट मधून मांडला. सादर करणारे कलाकार होते ; सीमा बेंद्रे, योगेश बेंद्रे, अन्वेश जोशी, वल्लरी जोशी, साईप्रसाद जोशी, विनिता जोशी, वसुधा भालेराव, अनंत गोखले. सर्व कलाकारांनी मिळून या स्किटचे संवादलेखन केले होते, चटपटीत संवादांनी खूपच मजा आली

स्वादिष्ट भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली मेनू होता गूळपोळी तूप, तिखट मिठाच्या पु-या लोणचे आणि पुलाव.....

कार्यक्रमाला खालील स्वयंसेवकानी बहुमोल सहकार्य केले.

तीळगूळ गौरी करंदीकर, प्रिया होशिंग, पूजा साटम 
कॉफी आणि भोजन व्यवस्था सुशील दुर्वास, प्रसाद देशपांडे,समीर आगरकर, केदार कुलकर्णी 
गूळपोळ्या वल्लरी जोशी, गौरी करंदीकर, अम्रिता जोशी, प्रिया होशिंग, पूजा साटम,सीमा बेंद्रे 
तिखटमिठाच्या पु-या & पुलाव मुक्ता कुलकर्णी, प्रणाली पारसनीस, रुपाली अमराडकर, स्मिता गोडसे
हळदीकुंकू पूजा साटम, प्रिया होशिंग 
फोटोग्राफी केदार कुंचूर 
कार्यस्थळ व्यवस्था गौरी करंदीकर

कार्यक्रमाची छायाचित्रे

धन्यवाद

आपले

मराठी मंडळ ब्लूमिंग्टन-नॉर्मल