कार्यक्रम

ब्लुमिंग्टन् मराठी मंडळाचे साधारणपणे दरवर्षी तीन कार्यक्रम होतात. संक्रांत, गुढीपाडवा व गणपती. ब्लुमिंग्टन् मध्ये कलाकार मंडळी भरपूर, त्यामुळे नृत्य, गायन व नाटक हे सर्व स्थानिक कलाकारच सादर करतात. ब्लुमिंग्टन् बाहेरही कार्यक्रम होतात.

२०२६च्या कार्यक्रमासाठी येथे  क्लिक करा.

२०२५च्या कार्यक्रमासाठी येथे  क्लिक करा.

२०२४च्या कार्यक्रमासाठी येथे  क्लिक करा.

२०२३च्या कार्यक्रमासाठी येथे  क्लिक करा.

२०२२च्या कार्यक्रमासाठी येथे  क्लिक करा.

२०२१च्या कार्यक्रमासाठी येथे  क्लिक करा.

२०२०च्या कार्यक्रमासाठी येथे क्लिक करा.

आपण कोविडमध्ये खूप ऑनलाइन कार्यक्रम घेतले आहेत ते कृपया आपल्या फेसबुकवर आणि आपल्या YouTube जाऊन नक्की बघा

मंडळ सुरू झाल्यापासून दरवर्षी गुढीपाडवा तीन अंकी मराठी नाटकाने साजरा होतो. आजवर या नाटकांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे श्री. गौतम करंदीकर यांनी.

गणपतीला लहान मुलांचे कार्यक्रम, एकांकिका, गाणी असे विविध कार्यक्रम होतात. याशिवाय पूजा, आरती, अथर्वशीर्ष, प्रसाद असतोच. या कार्यक्रमाला सर्वात जास्त प्रतिसाद मिळतो. मायदेशातून आलेले बरेच पालक या कार्यक्रमाला हजर असतात.

संक्रांत साजरी होते तिळगुळ ,हळदीकुंकु, आणि करमणुकीच्या कार्यक्रमाने. यात कधी असते एकांकिका,नृत्य,मराठी गाण्यांचा कार्यक्रम ,तर कधी कलाप्रदर्शन, आनंद मेळा ..!

आपल्या मंडळाला २०१० साली १० वर्षे पर्ण झाली, मंडळ सुरू झाल्यापासून दरवर्षी गुढीपाडवा तीन अंकी मराठी नाटकाने साजरा होतो. आजवर या नाटकांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे आपल्या लाडक्या श्री. गौतम करंदीकर यांनी. दहा वर्षातील १० नाटके, त्यांचे एकंदर ३३ प्रयोग.... ६० कलाकारांचा सहभाग...! अश्या या अभिमानास्पद नाट्यप्रवासाचे दिशादर्शक, दिग्दर्शक गौतम करंदीकर यांना सर्व कलाकारांतर्फे मानाचा मुजरा!!!!!! या निमिताने १०व्या प्रयोगाच्यावेळी दि.१७-एप्रिल-२०१० रोजी प्रकाशित करीत आहोत... "करंदीकरांची फॅक्टरी"


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२६ २०२५ २०२४ २०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००