कार्यक्रम २००० - पाडवा
१ एप्रिल रोजी “नॉर्मल टाऊनशीप हॉल” मधे मराठी मंडळाचा पहिला गुढीपाडवा… विविध गुणदर्शनाने साजरा झाला. मंडळात किती विविध प्रकारचे कलावंत आहेत याची एक झलक या पहिल्याच कार्यक्रमाने दाखवली.
गौरी करंदीकरांनी उपास्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले
कार्यक्रमाला सुरुवात झाली “जयोस्तुते श्री महन्मंगले” या समूह गीताने..सादर केले रेवा ठाकुर,म्रुदुला केतकर,प्रसन्न माटे आणी राजेंद्र भिडे यांनी. साथ होती हार्मोनीअमवर मोहन भिडे, तबला प्रवीण कमलापूर यांची.या समूहगीतानंतर सादर झालेली गाणी या प्रमाणे……..
| म्रुदुला केतकर | भूलोकीच्या गंधर्वा.. कोकिळा गा / दुसरे गीत - शंभो करुणा करा | 
| प्रसना माटे | आलि ठुमकत नार लचकत मान.. याला कोरस दिला विशाल डहाळकर, राजेंद्र भिडे, गणेश ओक यांनी. | 
| रेवा ठाकूर | नयनांच्या महली / दुसरे गीत - हसले मनी चांदणे | 
| वंदना नाईक | रेशमाच्या रेघांनी | 
| सुनील चाळीसगावकर | शुक्रतारा मंदवारा | 
| मोहन भिडे | तोच चंद्रमा नभात | 
| राजेंद्र भिडे | दिवस तुझे हे फुलायाचे | 
| गणेश ओक | ने मजसी ने परत मातृभूमिला - सिंथ वर सादर केले | 
संगीत सभेची सांगता झाली मोहन भिडे यांच्या अप्रतीम सोलो पेटीवादनाने…. त्यांना तबल्यावर योग्य साथ होती प्रविण कमलापूर यांची. कार्यक्रमाचे निवेदन लिहले होते गौरी करंदीकर यांनी आणि निवेदिका होती ज्योती कान्हेरे.
स्नेहल कदम ने शोभा मुदगल यांच्या “आली मोरे अंगना” या गाण्यावर ठसक्यात नाच करुन बालकलाकारंच्या कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली. निकीता कुलकर्णीने “सांग सांग भोलानाथ” या गाण्यातील शब्दांचे अमेरिकन पार्श्वभूमीवर केलेले रुपांतर सादर केले. विक्रम करंदीकर आणी अश्विनी गोखले यांनी पु.ल. देशपांडे यांच्या “वार्यावरची वरात “ मधील “दारु म्हणजे रे काय भाउ ?” ही वात्रटीका सादर केली. हर्षवर्धन भिडेनी उत्कृष्ठ मिमिक्री सादर करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली. वेगवेगळ्या हिंदी/मराठी सिनेकलावंतांच्या घरी खुप उंदीर झाले तर ते त्यावर कसा उपाय शोधतील व ते करताना कसे बोलतील त्याची हुबेहुब आवाज काढून प्रेक्षकांना चकीत केले.
त्यानंतर सादर झाला पु.ल. देशपांडे यांच्या “वार्यावरची वरात“ मधला एक प्रसंग. पु.ल. देशपांडे यांनी आडगांवात त्यांना एका व्याखानमालेत वक्ता म्हणून आलेले आमंत्रण… तिथल्या खास “गावांकडच्या” स्टाईल मधे त्यांचे झालेले स्वागत……. व्याख्यानमालेला जमलेले ईरसाल गांवकरी यांचे रंजक चित्रं रंगवले आहे आणि ते तितक्याच परिणामकारक रित्या सादर केले या कलावंतांनी…..
| पु.ल. देशपांडे | गौतम करंदीकर | 
| गरुडछाप तपकीरवाला | विशाल डहाळकर | 
| तुक्या | राजेंद्र भिडे | 
| गुणवंतीबेन बेचनवाला | गौरी करंदीकर | 
| अध्यक्ष | प्रसन्न माटे | 
| बोरटाके गुरुजी | राजेंद्र कुलकर्णी | 
| सुत्रसंचालक | प्रवीण कमलापूर | 
| ड्रील मास्तर | अकल्पित प्रभुणे | 
| गांवातल्या वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनीधी…. | |
| बजरंग तालीम | अरविंद पै | 
| खापरगांव भगिनीसमाज | प्राजक्ता कमलापूर | 
| अरुण वाड:मय मंडळ | विनोद ठाकूर | 
| बाताडे सायकल मार्ट | मोहन भिडे | 
मोठ्यांच्या या नाट्कात या बच्चेकंपनीचाही थोडासा सहभाग होता…. विक्रम करंदीकर, अमृता माटे, शाश्वती प्रधान, हर्षवर्धन भिडे, निकिता कुलकर्णी
दिग्दर्शन …….गौतम करंदीकर
मनोरंजनाने खुष झालेली मंडळी … तृप्त झाली श्रीखंड पुरीच्या रुचकर जेवणाने. हे जेवण बनवले होते आपल्याच मराठी मंडळाच्या भगिनींनी. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांची मोलाची मदत झाली…… गिरिश कदम, मेधा कदम, मुक्ता प्रधान, सुदर्शन प्रधान, माधुरी माटे, प्रसन्न माटे, अनिता देउसकर, सुनीती चितगोपेकर, लीना ठोंबरे, निधी किणीकर, प्राजक्ता कमालापूर, मिलिंद चिदंबर, अनुपमा भिडे, गौरी करंदीकर, गौतम करंदीकर, विनोद ठाकुर, रेवा ठाकुर.