पाडवा २०१०
पाडवा २०१०
  नाटक : प्रेमा तुझा रंग कसा?
ब्लुमिंग्टन-नॉर्मल वासियांसाठी गुढीपाडवा आणि मराठी नाटक हे एक गोड समीकरण आहे.त्यामुळे या भागातली मराठी मंडळी मंडळाकडून मिळणा-या “नाटक” मेजवानी साठी आतुरलेली असतात. या वर्षी कोणते नाटक सादर होणार याबद्दल जोरदार चर्चा अगदी जानेवारी-फेब्रुवारी पासूनच सुरु होते. त्यातून हे वर्ष मंडळाचे “दशकपूर्ती” चे वर्ष म्हणून प्रेक्षक खुप उत्सुकतेने नाटकाची वाट पहात होते.
प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला साजेसं असं “प्रेमा तुझा रंग कसा” हे वसंत कानेटकर लिखित ३ अंकी नाटक दिनांक १७ एप्रिल २०१० रोजी ब्लुमिंग्टन हायस्कूल येथे सादर करण्यात आले.
नावाप्रमाणेच या नाटकात विविध प्रेमाचे आविष्कार , रंग आहेत. जीवनात जी नाती आपण कुटंबात किंवा मित्र परिवारात बघतो , त्या नात्यांचे समर्थ दर्शन या नाटकात होते,
तसे हे नाटक फारच वेगळया धर्तीचे आहे ,यात विनोद आहे पण हे विनोदी नाटक नाही. यात कौटुंबिक नाट्य आहे पण हे नाटक तणावपूर्ण नाही. प्रेमातला संघर्ष आहे पण हे नाटक म्हणजे प्रेमीयुगुलांची प्रेमकथा नाही.यात सतत उत्कंठावर्धकता आहे पण हे सस्पेन्स नाटक नाही.
एकाच मध्यवर्ती पात्राभोवती हे नाटक फिरत रहात नाही..नाटकातील प्रत्येक पात्राला तेव्हढाच वाव आहे.
थोडक्यात एक नायक –एक नायिका असा साचेबंद पणा या नाटकात नाही.
नाटक सुरु होते प्रोफेसर बल्लाळ गुप्ते यांच्या घरात…. बल्लाळांची कन्यका बब्बड …बाजीराव उर्फ बाजा या तरुणावर भाळलेली आहे. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आहेत पण मुलीची आई प्रियंवदा आणि मुलाचे वडील निळुभाउ गोरे या दोघांचा लग्नाला तीव्र विरोध आहे… आई वडिलांच्या विरोधाला न जुमानता चक्क पळून जाउन लग्न करण्याच्या तयारीत आहेत.
बब्बड्ची भुमिका मानसी राक्षे यांनी उत्कृष्ठरित्या साकारली..लग्ना आधीची अवखळ प्रेमिका ,लग्नानंतर नवरा आपल्यासाठी पूर्वीसारखा वेळ देत नाही म्हणून चिड्चिड करणारे बायको, आणि व्यवसायाचा व्याप वाढल्यानंतर पतीबद्दलच्या काळजीने ,चिंतेने माहेरी मन न रमणारी पत्नी या विविध छटा मानसीने फारच छान दाखवल्या.
बाजीरावाची भुमिका केलेल्या निनाद वैद्य यांनी प्रेमात पडलेला उमदा तरूण , आणि लग्नानंतर् जबाबदारीने कर्तृत्व झळकवणारा पती असा दुहेरी उठावदार अभिनय केला.
बल्लाळांचा मोठा मुलगा बच्चू नुकत्याच अनुभवलेल्या प्रेमभंगाने संपूर्ण स्त्री जातीवर उखडलेला आहे तर बच्चूच्या भुमिकेत होते विशाल डहाळकर. प्रेमभंगाने खट्टू झालेला, नवीन प्रेमाच्या प्रतिसादाने लाजरा बुजरा होणारा बच्चू आपल्या सहजसुंदर अभिनयाने छान रंगवला.
प्रोफेसरांची एक विद्यार्थीनी “सुशील” हिचे या घरात येणेजाणे आहे. ही सुशील आपल्या सायकॉलाजीच्या धड्यानुसार बच्चुच्या प्रेमभंगाच्या जखमेवर मलम लावण्याच्या प्रयत्नात आहे….यातून त्या दोघांत वेगळेच प्रेमाचे बंध गुंफले जात आहेत. सुशीलच्या भुमिकेत होत्या अपर्णा केतकर. बच्चूला सायकॉलॉजीचे धडे शिकवणारी सुशीलला स्वतःच्या आयुष्यात मात्र हे धडे गिरवण्याचा प्रसंग येतो तेंव्हा होणारी मानसिक ओढाताण आणि भावनीक संघर्ष अपर्णाने छान दर्शवला.
मंदार कुलकर्णी यांनी भुमिकेला योग्य न्याय देत निळूभाऊ गोरेंची भुमिका अप्रतीम उभी केली. विशेषत: नाटकातील एका प्रसंगात जेंव्हा बाजा आपल्या वडिलांना म्हणजेच निळूभाऊंना विचारतो की तुम्हाला तरी आयुष्यात दिव्य प्रेमाचा अनुभव कुठे आहे ? तुम्ही कधी कुणावर प्रेम केलय ? निळूभाऊ त्यावर अतीशय समर्पक आणि काळजाला भीडणारे उत्तर देतात तो प्रसंग मंदार कुलकर्णींनी जबरदस्त ताकदीच्या अभिनयाने सादर केला.. नाटकातील त्या प्रसंगासह निळूभाऊ प्रेक्षकांवर छाप पाडून जातात.
प्रोफेसर बल्लाळांच्या नातीच्या छोट्याश्या भुमिकेत चमकली बाल कलाकार स्वरा केतकर.
नाटकातील सौ. व श्री बल्लाळ या दांपत्याची भुमिका केली ख-या आयुष्यातही पती-पत्नी असणा-या गौतम आणि गौरी करंदीकर यांनी. उत्कृष्ठ संवादफेक, परफेक्ट टाईम सेंन्स, दोघांचाही स्टेजवरचा सहज वावर विशेष उल्लेखनीय..! अभिनय क्षेत्रात करंदीकर पती पत्नी इतके परिपक्व झाले आहेत ते नाटकात अभिनय करत आहेत असे कुठे भासतच नाही .
आयुष्याच्या एका टप्प्यावर घरट्यातून पिल्लं उडून गेली की घरात येणार रीतेपण एकमेकांच्या सोबतीने कसे सोपे करायचे हे सांगणारा शेवटचा सीन दोघांच्याही अप्रतीम अभिनयाने प्रेक्षकांच्या विषेश स्मरणात राहील.
हसवता हसवता टचकन डोळ्यात पाणी आणणारे कौटुंबीक नात्यागोत्यातील सर्व प्रेमरंगांचा समर्थ आविष्कार दाखवणा-या नाटकाचे दिग्दर्शन केले गौतम करंदीकर यांनी. एखादे नाटक जेंव्हा नेहमीच्या नाटकाच्या साच्यापेक्षा भिन्न असते तेंव्हा सर्वात जास्त जबाबदारी दिग्दर्शकाची असते.याचे कारण प्रत्येक भुमिका ही त्या त्या सीन साठी मध्यवर्ती भुमिका होत जाते , प्रत्येक उलगडत गेलेल्या नाट्यप्रसंगाने संपूर्ण नाटक फुलत जाते..ही सलगता कायम ठेवत,प्रत्येक प्रसंग खुलवण्याची किमया फक्त दिग्दर्शकच करू शकतो.या नाटकाचे दिग्दर्शक गौतम करंदीकर यांनी आपल्या अनुभवसंपन्न ,कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने प्रत्येक प्रसंग खुलवत नाटकाचा विशिष्ठ वेग कायम ठेवत अत्यंत यशस्वी प्रयोग सादर केला.
सेट वर ही प्रथमच दोन लेव्हल्स वापरून संपूर्ण स्टेजचा कल्पकतेने वापर केला आ्णि प्रेक्षकांची सेट साठीही विशेष दाद मिळवली.
ब्लूमिंगटन व्यतीरिक्त या नाटकाचे इंडियानापोलीस, सेंट लूईस, मिलवॉकी, येथील मराठी मंडळात यशस्वी प्रयोग झाले.
नाटकाच्या यशस्वी प्रयोगाचे श्रेय कलाकांरा इतकेच पडद्या मागील सहका-यांना असते.
त्यांची श्रेयनामावली अशी……
पार्श्वसंगीत : आशिष भंडारे
नेपथ्य : मोहीत पोतनीस, अनुप तापकीर, अश्वीन आगरवाल, फणींद्र केतकर, सिद्धार्थ भट्टाचार्य
विशेष सहाय : उज्वला जाधव, जयाताई भंडारे, उदय परांजपे, अनुराधा गोडबोले, अर्चना नाडकर्णी, रोहन गुर्जर, अभिजित कर्णिक
व्हिडीओ चित्रण : मिलिंद लोंबार, सचीन बुचे, हेमंत कुलकर्णी
फोटोग्राफी : वैभव शिरोडकर
तिकीट विक्री : अभी शेंडे ,अभिजीत नेरुरकर ,उदय परांजपे, पंकज शहा ,शिवप्रसाद केसरे, युवराज सोनवणे, विनोद म्हसे, मंदार कुलकर्णी, सचीन टकले, लक्ष्मण चौधरी, नितीन म्हसे, बाळकृष्ण कामत, योगेश सावंत, मकरंद कुरुंदकर, कुणाल लाड, सुदर्शन पलांडे, अभय थप्पन, निवेदिता कुलकर्णी,
अल्पोपहार : सुदर्शन पलांडे, अभि शेंडे, साईएश प्रकाश, श्वेता बनसोड, सचिन टकले, शिवप्रसाद केसरे,
बेबीसिटींग : निवेदिता कुलकर्णी, प्रीती पाटील, अनुराधा गोडबोले,
नाटकाच्या प्रयोगा नंतर पुस्तक प्रकाशनाचा एक विशेष कार्यक्रम झाला.
मंडळ सुरू झाल्यापासून दरवर्षी गुढीपाडवा तीन अंकी मराठी नाटकाने साजरा होतो. आजवर या नाटकांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे श्री. गौतम करंदीकर यांनी.
या निमिताने १०व्या प्रयोगाच्यावेळी दि.१७-एप्रिल-२०१० रोजी प्रकाशित झाले... "करंदीकरांची फॅक्टरी"
या पुस्तकाची संकल्पना विशाल डहाळकर यांची. १० वर्षातल्या आजी-माजी कलाकारांनी, आणि काही प्रेक्षकांनी दिग्दर्शक गौतम करंदीकर यांच्या दिग्दर्शना बद्दलचे आपले अनुभव, नाट्यप्रवासातील हृद्य आठवणी पुस्तक् रूपाने प्रकाशीत करून , दहा वर्षातील १० नाटके, त्यांचे एकंदर ३३ प्रयोग.... ६० कलाकारांचा सहभाग...! अश्या या अभिमानास्पद नाट्यप्रवासाचे दिशादर्शक, दिग्दर्शक गौतम करंदीकर यांना केला सर्व कलाकारांतर्फे मानाचा मुजरा!!!!!!
आश्लेषा राऊत
नाटकाचे  पोस्टर     
  नाटकाची छायाचित्रे 
  
    
  कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
  
  २०२४
  २०२३
  २०२२
  २०२१
  २०२० 
  २०१९ 
  २०१८ 
  २०१७ 
  २०१६ 
  २०१५ 
  २०१४ 
  २०१३ 
  २०१२ 
  २०११
  २०१०
  २००९
  २००८
  २००७
  २००६
  २००५
  २००४
  २००३
  २००२
  २००१
  २०००