भेळ आईस्क्रीम पार्टी
मराठी मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेली “भेळ आणि आईस्क्रीम पार्टी” रविवार दि.१३ जुलै रोजी संध्याकाळी Anderson Park येथे उत्साही वातावरणात मस्त रंगली.
ब्लुमिंगटन मध्ये नव्याने आलेल्या मंडळींची ओळख  आणि मायदेशातून आलेल्या पालकांचे स्वागत उद्देशाने हा  भेळ पार्टीचा बेत आखला जातो . सुरुवातीला सौ.गौरी करंदीकर यांनी उपस्थितांचे  स्वागत करून 
  मराठी मंडळाच्या विविध कार्यक्रमांची माहिती  दिली .,आणि 
  नवीन मंडळी आणि पालकांनी त्यांचा परिचय  करून दिला .उत्साही 
  सर्वांनी चटकदार भेळेचा आणि आईस्क्रीमचा आस्वाद  घेत मस्त गप्पा मारल्या. 
त्या नंतर अमित देशपांडे, विक्रम चिमोटे, मयुरा कुलकर्णी, अमृता देवधर, मंदार कुलकर्णी यांनी सुरेख गाणी गाऊन  कार्यक्रमाची रंगत वाढवली. 
  लहान मुलांनीही झोपाळा-घसरगुंडी, फुटबॉल खेळून भरपूर मजा केली. 
  सर्वांनीच  या छोटेखानी कार्यक्रमाचा मनापासून  आनंद लुटला. 
नेहमीप्रमाणेच मंडळाच्या या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले – अनुजा दुर्वास, रश्मी गोखले, अस्मिता राउत, पल्लवी निकम, अमृता देवधर, दिपाली देशपांडे, सिद्धार्थ खाडे, गणेश भदाणे, आशिष डहाके,अक्षय साटम, अमोल होशिंग .
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
वृत्तांकन 
  सुखदा खोंबारे