संक्रांत
संक्रांत - २०१२
''तिळगुळ घ्या गोड बोला.'' या एकमेकांना शुभेच्छा देत नववर्षातील ''मकरसंक्रांत'' हा मंडळाचा वर्षातील पहिला कार्यक्रम १५ जानेवारी रोजी Bloomingrove सभागृहात आनंदात साजरा झाला. तिळगुळ, हळदीकुंकु व वाण देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.
''झंकार'' या विविधरंगी संगीत मैफिलीत सुरवातीला "मृगनयना रसिक मोहिनी" हे नाट्यपद समीर बिल्डिकर यांनी प्रस्तुत केले. गौरी सरदेसाई यांनी "एकला नयनाला विषय तो झाला" हे अवीट गोडीचे नाट्यपद सादर केले. समीर बिल्डिकर यांनी जोहार मायबाप जोहार हे बालगंधर्वांचे गाजलेले पद आपल्या खास शैलीत सादर केले.
या नाट्यपदानंतर मनप्रीत बेदी यांचे तबलावादन सादर झाले. नाट्यगीतांना आणि तबलावादनाला हार्मोनियम वर साथ केली प्रसन्न माटे यांनी...
आरती कुलकर्णी यांनी सादर केली "घनरानी साजणा" आणि "राधा ही बावरी" ही गाणी. "मन उधाण वाऱ्याचे", "का कळेना कोणत्या क्षणी", "परवरदिगार" या सुपरहिट गाण्यांची मेडली राजेश चलम यांनी प्रस्तुत केली.
त्या नंतरलहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग असलेल्या कलाप्रदर्शनाबद्दल अनुजा दुर्वास यांनी माहिती दिली.
हास्यमैफिलीची सुरुवात सचिन पानसकर, अनुराधा पानसकर, विनोद म्हसे यांच्या “कोलंबस गद्रे” या स्कीटने झाली. लेखन केले होते “फु बाई फु” फेम सचिन मोटे यांनी तर दिग्दर्शन गौरी करंदीकर यांनी केले होते.
अनंत गोखले आणि सुखदा खोम्बारे यांनी पुणेरी मंगलकार्यालयाचा धमाल किस्सा "मंगल कार्यालय" या स्कीटमध्ये प्रस्तुत केला. या स्कीटचे लेखन सचिन मोटे तर दिग्दर्शन गौरी करंदीकर यांनी केले होते.
सोनाली पाटील आणि सोनाली कर्णिक यांच्या "अहो आई" या स्कीटचे लेखन व दिग्दर्शन केले होते गौरी करंदीकर यांनी.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बहारदार fusion dance सादर केला तृप्ती शिंपी, कुलदीप शर्मा, मीनल गुर्जर, लक्ष्मी विजयवर्गीय, संतोष पुरोहित यांनी. नृत्यदिग्दर्शन कुलदीप शर्मा यांनी केले होते.
कार्यक्रमाची सांगता झाली पंजाबी "भांगडा" या नृत्यप्रकाराने. कलाकार होते....हरमीत पदम सिंग,सौरभ काळे, रश्मी काळे,संदीपकुमार सिंग,संदीप सुलेजा, रिटा बायस, रम्या लक्ष्मी व अपूर्वा जोशी. नृत्यदिग्दर्शन हरमीत पदम सिंग यांनी केले होते.
| कलाप्रदर्शानातील सहभाग | उत्तम नाईक (paintings, sketches) | 
| केदार वाणी, दिप्ती वाणी... (paintings, photographs) | |
| माधुरी माटे. (photographs) | |
| शिल्पा पोतनीस (embroidery) | |
| अमित मनोहर (photographs) | |
| अनुजा दुर्वास (jewelry, photographs) | |
| ओरीगामी प्रदर्शन: बालकलाकार सहभाग | ओवी डहाळकर, रोनक पोतनीस, सारा कुलकर्णी, अमेय इदाते, झारा गुर्जर, मोक्ष दवे , श्रुती पाटील, सोनल गानू, ह्रितिका नाईक, ओजस डहाळकर, अन्विता लिमये, प्रिया जोशी, मीरा वाघ, ऋजुता दुर्वास, रिया गुर्जर, ऋचा खेर,अनुष्का लिमये, राधा वाघ, अथर्व सरदेसाई, मंत्र दवे, श्रीया मालपाणी, गार्गी खेर, सानिका बुचे, अक्षय बुचे | 
संक्रांतीचा खास मेनू गुळाची पोळी आणि साजूक तूप या भोजनातील विशेष पदार्थांचा सर्वांनी आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी गोखले यांनी केले होते.
अशी होती या यशस्वी कार्यक्रमाची स्वयंसेवक टीम
| कार्यक्रम संयोजक | निवेदिता कुलकर्णी, अनुजा दुर्वास | 
| कार्यस्थळ व्यवस्था | गौरी करंदीकर, | 
| हळदीकुंकु | श्रुती डहाके, अमृता टिळेकर, स्वेताश्री म्हसे | 
| तिळगुळ | निवेदिता कुलकर्णी, गौरी करंदीकर, अनुजा दुर्वास, रश्मी गोखले | 
| कलाप्रदर्शन संयोजन | अनुजा दुर्वास | 
| कार्यक्रमाचे सूत्रसंचालन | रश्मी गोखले | 
| ध्वनी योजना | मोहित पोतनीस, समीर बिल्डिकर, आशिष डहाके | 
| भोजन व्यवस्था | श्वेताश्री मुखर्जी, विनोद म्हसे, सचिन बुचे, मंदार कुलकर्णी, रोमेल पारसनीस, गणेश भदाणे, पराग काजरोळकर, रोहन नाईक, शानू त्यागी | 
| विशेष आभार | पूनम शेष, अभिजित कर्णिक, अनंत गोखले, अभी शेंडे, अभिजित नेरुरकर | 
| छायाचित्रकार | रोहन गुर्जर, शिरीष खापरे, केदार वाणी | 
---रश्मी गोखले---