संक्रांत
संक्रांत - २०१४
आपल्या मराठी मंडळाचा २०१४ या नवीन वर्षातील पहिला कार्यक्रम संक्रांतीच्या निमित्ताने Attractive Alternative सभागृहात १९ जानेवारीला दणक्यात साजरा झाला.
प्रथेप्रमाणे तिळाची वडी देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.. स्त्रियांसाठी हळदी-कुंकू आणि वाण म्हणून “जोडवी” देण्यात आली.
रणधीर ठाकूर यांनी आपल्या खुमासदार शैलीत निवेदन करत उपस्थितांचे स्वागत केले आणि करमणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. अमृता जोशी यांनी अतिशय मधुर आवाजात स्वागतगीत सादर केले. गाण्याचे बोल होते “अथ स्वागतम्, शुभ स्वागतम्”.
त्यानंतर प्रश्नमंजुषेचा खेळ रंगला. Jeopardy च्या संकल्पनेवर आधारित या प्रश्नमंजुषेचे आयोजन-आरेखन, सादरीकरण केले अभिजित नेरुरकर यांनी आणि त्यांना साहाय्य केले चैताली भाटवडेकरने. स्पर्धकांचे ३ गट करण्यात आले आणि ‘भाषा व साहित्य’,’मनोरंजन’,’पर्यटन’,’इतिहास व राजकारण’,’क्रीडा’आणि ‘मिश्र’ अशा ६ विषयांशी निगडीत २४ प्रश्न प्रत्येक गटाला विचारण्यात आले. गट आणि स्पर्धक खालीलप्रमाणे होते.
| Bournvita | समीर आगरकर, सुखदा खोंबारे ,निवेदिता कुलकर्णी | 
| Complan | सचिन पानस्कर, वंदना बाजीकर, राधिका गरुड | 
| Horlicks | अदिती दळवी, मोहित पोतनीस, हेमंत कागले | 
यामध्ये बाजी मारली “Complan” गटाने (सचिन पानस्कर, वंदना बाजीकर, राधिका गरुड) . मनोरंजनासोबतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या ज्ञानात भर घालून गेला.
यानंतर सादर झाली  एकापेक्षा एक धम्माल गाणी.  खास मंडळाच्या कार्यक्रमासाठी  Michigan इथून आले होते  अमित देशपांडे. त्यांनी  हृदयनाथ मंगेशकरांच्या अतिशय लोकप्रिय अशा  “लाजून हसणे अन हसून ते पाहणे”  या सुंदर गीताने  सुरांच्या मेजवानीला सुरुवात केली.  अजय-अतुल यांची  गाजलेली लावणी “वाजले कि बारा”  सादर केली नेहा  जोशी यांनी. अमित  देशपांडे यांनी गायलेले मुंबई-पुणे-मुंबई  चित्रपटातील गाणे “कधी तू...”  सर्वांच्या पसंतीस न उतरते  तरच नवल! अनंत  गोखले यांनी “राधा ही बावरी”  हे गीत सादर  करून प्रेक्षकांच्या टाळ्या  मिळवल्या. किशोरदा-पंचमदा जोडीने  दिलेले hit गाणे “ये जो मोहब्बत है”  गायले अमित देशपांडे  यांनी. त्यानंतर विक्रम चिमोटेने  अतिशय सुरेखरीत्या गायलेल्या  “विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती”  या गाण्याने सर्वांचीच  भरभरून दाद, टाळ्या,  शिट्या आणि once more पण मिळवला.  त्यानंतर अमितने “दगाबाज रे”  हे गीत म्हणले.  मग प्रेक्षकांच्या आग्रहास्तव  “मल्हार वारी”  आणि “मुसाफिर हुं यारो”  ही गाणी पण  सादर करून प्रेक्षकांची  मने जिंकली.
  
  रणधीर यांनी ग्रामीण  बोलीतून उखाणे घेऊन प्रेक्षांच्या  टाळ्या मिळवत निवेदन रंगवले.  कार्यक्रम मस्त रंगला  होता आणि प्रेक्षकांच्या  भेटीला आला “देस रंगीला”  हा नृत्याविष्कार. आपण आपल्या  मायभूमीपासून हजारो मैल दूर  इकडे परदेशात असलो  तरी मातृभूमीप्रती असलेले  आपले प्रेम कधीच  कमी होत नाही.  त्यातून आपला भारत  देश विविधतेने नटलेला.  प्रत्येक प्रांताची वेगवेगळी संस्कृती.  खाद्य संस्कृती असो  वा नृत्यशैली. “विविधतेत एकता” असा संदेश  देणारा बहुरंगी नृत्याविष्कार प्रेक्षकांची  वाहवा मिळवून गेला.  याची संकल्पना होती गौरी  करंदीकर यांची आणि नृत्य दिग्दर्शन केले कुलदीप  शर्मा याने. सहभागी  कलाकार होते-
| महाराष्ट्र लावणी | दीप्ती मेनन, गीतांजली सरकार | 
| आंध्रप्रदेश | ग्रीष्मा राउत (भरतनाट्यम) | 
| केरळ | कल्याणी गालपल्ली, शिल्पा पतंगे, अक्षय साटम, आकाश परांजपे | 
| जम्मू काश्मीर | रती काटदरे, श्रद्धा मुखेडकर, विक्रम चिमोटे, निलेश जावळकर | 
| पश्चिम बंगाल | नीलम चिमोटे, अपर्णा जावळकर (नृत्यदिग्दर्शन – प्रणाली) | 
| राजस्थान | लक्ष्मी विजयवर्गीय, प्रणाली पारसनीस | 
| पंजाब | दीप्ती तावरे, ज्ञानेश्वर तावरे | 
या झकास  नृत्याबरोबरच कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वांना dinner box देण्यात आले.  गुळपोळीची चव चाखण्याचा  आनंद त्यानिमित्ताने मिळाला.  शिवाय ठेपले, पुलाव  जोडीला होतेच.
   
  कार्यक्रम यशस्वीपणे पार  पाडण्यासाठी नेहमीप्रमाणेच मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
| कार्यस्थळ व्यवस्था | गौरी करंदीकर, आशिष डहाके | 
| तिळगूळ | चैताली भाटवडेकर, गौरी करंदीकर, श्रुती डहाके,आरती पाटील | 
| हळदी कुंकू | दीपिका राऊत, आरती पाटील | 
| ध्वनी, पार्श्वसंगीत | नागेश गालपल्ली | 
| भोजन व्यवस्था | श्रुती डहाके, सिद्धार्थ खाडे, पल्लवी खाडे, सुखदा खोंबारे, अनामिका बेरड, पल्लवी निकम, समीर आगरकर, शर्मिला आगरकर, अनंत गोखले, सचिन पाटील | 
| छायाचित्रण | स्वप्नील राऊत, कृष्णा नायक, हेमंत कुलकर्णी | 
| तिकीटविक्री | गौतम करंदीकर, उदय परांजपे, निवेदिता कुलकर्णी | 
वृत्तांकन 
  - सुखदा खोंबारे