संक्रांत - २०१६
संक्रांती निमित्त मराठी मंडळाने यंदा दोन कार्यक्रम आयोजित केले होते .
रविवार दिनांक २४ जानेवारी २०१६ रोजी महिलांसाठी हळदी कुंकू,आणि रविवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सर्व सभासदांसाठी मराठी चित्रपट “नटसम्राट”
दोन्ही कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला .
Attractive Alternative येथे दुपारी ४ वाजता हळदीकुंकवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.
मराठी म्हणी , वाक्प्रचार ,चारोळ्या, मराठी नाटक सिनेमातील गाजलेले संवाद यावर आधारीत गेम्स सगळ्याना खूप आवडले .
कडाक्याच्या थंडीत गरमागरम रगडा पॅटीस आणि कॉफीने कार्यक्रम आणखीनच खमंग केला . तीळगुळ वडी आणि छोटा डबा असे वाण लुटण्यात आले .
  कार्यक्रमाला  खालील स्वयंसेवकानी बहुमोल सहकार्य केले.
   
| कॉफी | गौरी करंदीकर | 
| अल्पोपहार व्यवस्था | पल्लवी टकले, पूनम सावंत, मेधा राजगुरू , सीमा बेंद्रे ,  दिपाली देशपांडे ,अम्रीता जोशी , प्राची परांजपे  | 
  
| हळदीकुंकू | रश्मी गोखले, वृषाली कुलकर्णी, स्नेहल तिवाटणे | 
| फोटो | प्रियांका मानेकर | 
| कार्यस्थळ व्यवस्था | गौरी करंदीकर | 
आपले
मराठी मंडळ ब्लूमिंग्टन-नॉर्मल