अभिप्राय

===================================================

खोटेबाई आता जा…! २००९

===================================================

From: Vishal Dahalkar
Subject: Thank You!!!
Date: Monday, April 27, 2009, 11:54 AM

Some things never change… some things come out as a revelation… 

शनीवारचं नाटक was right up there in terms of execution – acting, music, set, direction… all fit to the last detail… as expected…

The revelation was the new talents that were on display…

प्राची परांजप…..मी संक्रांतीच्या छोट्या नाटकात पाहिलं होत ..मोठ्या नाटकात पहिल्यांदाच पाह्यलं….एकंदर ठसका आणि गौतम वर ओरडण्याची हातोटी एकदम झकास…… Basically पूर्ण 2-3 तास tempo एकदम maintained… जेंव्हा   “फ़िट येइलl”, “हार्ट फ़ेल होईल” म्हणुन खाली बसणे
आणि खोटेबाईंनी “काही होत नाही” म्हटल्यावर जी reaction होती …मस्तचं… अनिरुध्द/गौरी च्या टायमिंग सोबत बाकी सर्वांची reaction timing was the key to that portion. and the laughter probably told the story!!!

गौरी i – “आता आम्ही काय म्हणायचं”.. हे नेहमीचं टुमणं सोडलं तरी ….I guess doing a comedy is more difficult than doing serious roles… आणि त्यात बाजी मारलीत.लीलया म्हणायला पण हरकत नाही अनिरुद्धने तुम्हाला स्टडीत ढकलून दिलं तो . scene ofcourse अशक्य…आणि पैसे घेताना पण, …आणि अजुन बरेच काही…..

प्रीती ..ताई म्हणुन जे काही केलस स्टेजवर बेस्ट होत..रडणं/ हसणं…आणि चिडणं …ताई शोभलीस….!
मंजिरी चेह-यावरचे मिश्किल हसू तुझ्या भुमिकेला एकदम पूरक होते..अनिरुध्द आणि तुझ्या केमिस्ट्रिने मजा आणली.

अनिरुध्द ..लय भारी रे दादा…..पडलास काय…धड्पड्लास काय….… overall तुझ्या माकडचेष्टांना काही तोड नव्हती ….… action आणि dialogue दोन्ही मधे उच्च delivery… कपबशीचा कॅच overall ‘खोटे “ शब्दावरचे विनोद सगलच एकदम perfect timing… too good sir.. Hats off!!!

सिध्दार्थ … सुंदर काम केलेस ..श्रीमंत वडिलांचा देखणा मुलगा शोभलास. रोलची dignity maintain केलीस तु मराठी नाहीस हे कुणाला सांगीतल्या शिवाय कळणार नाही हे एकदम खरे…
जीवन ..छोटासा रोल ..पण overall serious/ shy personality बरोबर project केलीस..…

हेमंता पाटील…..सेनापती शोभलात….अर्थात चिडण्या साठी natural acting होती म्हणा!!  you looked extremely smart, and like a owner of a s/w company… ताठ मानेचा चिडका माणूस perfect वाटलास …!!! I am sure many more to come!!!

गौतम – You have amazed us every year… You did it again… कसलं जबरदस्त timing… जबरदस्त आवाज,… जबरदस्त दिग्दर्शन ,सगळच जबरदस्त… तुम्हाला स्टेजवर पाहुनच तिकिटाचे पैसे वसूल झाले … rest all was a bonus… नाटकाचा पहिला अंक उत्तम होणार हे माहीत हो्तं…..तो tempo पुढे कसा राहील अशी एक छोटीशी शंका होती (नाटक वाचल्यावर)… पण असल्या शंका तुम्ही तिथे असताना निव्वळ कुचकामी आहेत हे पुन्हा एकदा सिध्द केलेत.… You deserved a standing ovation each time you directed a play here…This time is was much more than that!!

Overall –सर्वांनी मिळून अजुन एक अविस्मरणीय भेट दिली …… THANK YOU!!!!
  आपल्या सर्वांचा नवा “fan”

~ Vishal Dahaalkar.

===================================================

From: Mayuresh Deshpande
Sent: Monday, April 27, 2009 1:13 PM
To: Gautam Karandikar
Subject: बहारदार

नाटकमंडळी,

अभिनंदन, त्रिवार अभिनंदन. तुम्ही शनिवारी एकदम बहार आणलीत. सर्व टाळे आणि हशे व्यवस्थित वसूल केलेत. तसं मी नाटक आधी पाहिलेलं असूनही तीन तास कधी आणि कसे गेले समजलच नाही. फारच छान. ज्या लोकांनी हे पहिल्यांदाच पाहिलं त्या सगळ्यांनी सस्पेन्स् खूपच छान ठेवल्याचं मला सांगितलं. छान टीमवर्क होतं. जमेल तसं प्रत्येकाला शाबासकी देण्याचा प्रयत्न करत आहे.

इशाः एकदम खणखणीत एनर्जी. माईक एवढ्या जवळ असूनही त्याचा वापर खूपच सराईतासारखा झाला. नाटक पुढे नेण्यासाठी असलेली सर्व वाक्यं फारच प्रभावीपणे मांडली, त्यामुळे नाटकाला त्याचा छान उपयोग झाला.

अनिरुद्धः ब्लुमिंग्टन् ला मिळालेला अजून एक कसलेला कलाकार. तुझ्या लवचिकतेचं मागच्यावेळेसच मी कौतुक केलं होतं, त्याचा प्रत्यय तू याहीवेळेला दिलास, प्रसंगाची आणि त्यातल्या विनोदाची तुला फार सुंदर जाण आहे किंबहुना ते नैसर्गिक आहे तुझ्याठायी, फार महत्वाचा गुण. कृपा करून नाटक हा छंद कुठेही असलास तरी जोपासायचा प्रयत्न कर, लोक तुला दुवा देतील. J

निशाः नाटकभर तुझा वावर खूपच सहज होता. वाक्यांची फेकही चपखल एकदम.

मम्मीः प्राची, पुन्हा एकदा तुम्हाला स्टेजवर बघायला छान मजा आली. खणखणीत आवाज ही फारच जमेची बाजू.

पप्पाः मॅन ऑफ द् मॅच आणि मॅन ऑफ द् सिरीज बरं का एकदम. विनोदाची टायमिंग्ज् खूपच भारी होती. बेअरिंग खूपच मस्त सांभाळलं होतं. आवाजाची लवचिकता अप्रतिम, इतक्या सगळ्या वर्षांची मेहनत आणि अनुभव ठायीठायी दिसत होता. सगळ्यांनी खूपच एंजॉय केला तुमचा पार्ट, ब्लुमिंग्टन् ला एक “नवीन” कलाकार मिळाला J J

पप्पा काळेः हेमंता तुझा वावर एकदम रुबाबदार आणि व्यक्तिरेखेला साजेसा होता. आवाजाचा तुझा बाजही याला साजेसा ठरल्याने खूपच मजा आली.

सिद्धार्थः कौतुक तुझं करावं तितकं कमीच. सांगूनही खरं वाटत नाही की मराठी ही तुझी मातृभाषा नाहीये. शेवटचा तुझा पीस तू छान वेळ घेऊन केलास. सुंदर

मोहन : तुझं अतिशय सज्जन दिसणं आणि त्याला साजेशी संवादफेक दोन्ही पात्रासाठी एकदम चपखल होती.

सौ. खोटेः आपलं आम्हाला पाहायला मिळालेलं अजून एक रूप. गेल्या पाच वर्षात पाच वेगवेगळी रुपं ताकदीनं उभी करून अभिनय कौशल्याची लांबी आणि रुंदी बुलंदपणे दाखवली आहात. कमाल आहे. खोटेबाई तुम्ही अजून जोमानं काम करत राहा!!

===================================================

From: "Yogesh Sawant"

Congratulations to the natak team for a successful performance in Bloomington. Just wanted to convey that Madhura and I liked the natak very much. It gave a pleasant feeling with a very nice blend of comedy and suspense.

The 3-4 months of hard work materialized well and you might have realized that from the response from the audience. Now its time to party hard.

Enjoy
Yogesh

===================================================

From: Shilpa Patange
Sent: Monday, April 27, 2009 12:03 PM
To: Gautam Karandikar
Subject: Awesome!

Hello Gautam,

You might not know me but I specially wanted to send this note of gratitude for the wonderful job you all did. I loved the “Natak”…

I just got relocated to Bloomington last year in June from Columbus OH. I was so nervous to come to this small town like place from big city but I am actually been thrilled by the activities and enthusiasm and unity.

It’s all because of dedicated people like you..

Thanks so much for the wonderful evening and I can’t wait for the next such occasion. Awesome!

Please note: My husband could not attend it as he is been working in Harford Connecticut and visits us periodically. I would like to purchase DVD when it comes through.

Let me know. Thanks so much!

Thanks and Regards,
Shilpa Patange

===================================================

From: Raju Khandave
Sent: Monday, April 27, 2009 9:13 AM
To: Gautam Karandikar

Gautam sir,

Natak ekdam best zale …maja ali …..Now I realized what I missed last year  …

Thanks,
Raju Khandave

===================================================

From: Rohit Deshpande
Sent: Monday, April 27, 2009 9:22 AM
To: Gautam Karandikar
Subject: congratulations

Hi Gautam!

I wanted to congratulate you on such an excellent play on Saturday. I couldn’t meet you after the play and I thought you might be busy with too many people writing IMs or visiting you so I thought I will send you an email.

The play was simply awesome and everything was just perfect. I couldn’t have imagined such a play in US. Other than that hidden benefits like having our culture preserved in US are always there.

I couldn’t be of much use this time. I hope it won’t be same next time..

Regards,
Rohit

===================================================

“कार्टी प्रेमात पडली” २००८

===================================================

From: "Sachin Buche"
You Did It !!
Monday, April 7, 2008 11:21 AM

Team,

Heartiest Congratulations on a splendid show on Saturday. All of you did a tremendous job on your part. Those songs, dances, timing, lights, set… simply wonderful.

For the first time I was sitting in the audience and to be honest, didn't like it at all (just sitting there I mean). Haath shivshivat hote.

Gautam - Many Many congratulations for the silver jubilee and we hope to see a lot more (and be part of it also). You are the true Showman !!

Thanks,
Sachin Buche

===================================================

प्रेमाच्या गांवा जावे…२००७

===================================================

From:   Prasanna Mate 
Sent:   Monday, April 09, 2007 2:15 PM
Subject:        Natak... Uttam!!

नमस्कार,

प्रेमाच्या गावा... च्या ब्लुमिंग्टन् च्या यशस्वी प्रयोगाबद्दल हार्दिक अभिनंदन. प्रेक्षकांची दादच सर्व सांगून गेली. सर्व नवीन कलाकारांनी मंडळाच्या नाटकाचा दर्जा कायम ठेवला (काहींनी तर जरा उंचवलाच… ) त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. दर वेळेस काही जुने काही नवे खेळाडू घेऊन यशाची नवनवीन शिखरे काबीज करण्याच्या गौतमच्या हातोटीची दाद द्यावी तेवढी थोडी आहे. अर्थात या सर्वात टीमचा त्याच्यावरील विश्वास आणि नेमून दिलेली कामे पार पाडणे हेही तितकेच मह्त्वाचे.

नाटकाबरोबरच इतर कामेही तितकीच महत्वाची. नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, छायाचित्रण - स्थीर आणि चलत (या तर चीरकालीन आठवणी), बेबी-सिटींग्, अल्पोपहार, ... सगळ्या... सगळ्याच गोष्टी वाखाणण्यासारख्या होत्या.

मला वाटतं ब्लुमिंग्टन्-नॉर्मल् असं एकमेव ठीकाण असेल जिथे अशा प्रकारचे सांस्कृतीक कार्यक्रम इतक्या सातत्याने आणि चांगले होत आले आहेत. आपल्या सर्वांच्या सहकाराने ते असेच चालत राहोत ही सदिच्छा.
नावं लक्षात ठेवण्याबद्दलचं माझं वैशिष्ठ्य सर्वश्रृत आहेच. तेव्हां काही नावे अनवधानाने राहिली असल्यास त्यांना माझा निरोप जरुर कळवा.

पुढल्या प्रयोगात असेच घवघवीत यश मिळवाल ही खात्री आहे.
- प्रसन्न माटे.

===================================================
From:   Abhi Shende 
Sent:   Monday, April 09, 2007 3:02 PM

Mandali - It was great performance!!!! Congratulations!!!!!!!!!

Here's something I forgot to mention earlier: After the show, a few people from Decatur and Peoria told me that they are very impressed with program and showed interest in attending future BMM events. I have requested them to join our mailing group. You all have made BMM look great. Compliments from outsiders makes us feel good.

===================================================

From:   Anant Gokhale 
Sent:   Monday, April 09, 2007 1:39 PM
To:     Gautam Karandikar; gouri
Subject:      अभिनंदन

नमस्कार,
“प्रेमाच्या गावा जावे “…वसंत कानेट्करांचे इतकं छान नाटक…त्यात तुम्ही सर्वांनी खुप जिवंतपणा आणलाय.

दादरला शिवाजी मंदीर ला किंवा पुण्याला बालगंधर्व ला नाटक बघुन आल्याचा आनंद मिळाला,

प्रत्येक जण आपापल्या भुमिकेत एकरुप झालेला होता.

तुम्ही सर्वांनीच खुप मेहनत घेतली, तुम्हा सर्वांना पुढील प्रयोगा साठी शुभेच्छा..!.

लोभ असावा
अनंत गोखले

===================================================

From "Sonali Dike
Congrats!!!
Thursday, April 12, 2007 9:15 AM

गौतम, गौरी

नाटकाचा प्रयोग उत्तम झाला… आमची एक संध्याकाळ उत्तम नाटकाचा आस्वाद घेत (आणि खमंग वडा पाव खात) जाते ह्याचे श्रेय तुम्हा दोघांना आणि तुमच्या सर्व टिम ला आहे.पुण्यात बघितलेल्या नाटकांच्या आठवणी तुम्ही ताज्या करता…..धन्यवाद…!

Keep it up!
 
सोनाली डिके

===================================================

From: "Sameer Kulkarni"
punha ekda abhinandan
Monday, April 30, 2007 10:46 AM

करंदीकर

परवा टाळ्या वाजवुन आणि प्रत्यक्ष कौतुक करुन मन भरलं नाही म्हणुन पुन्हा एकदा इमेल मधुन तुम्हा सर्वांचे कौतुक करत आहे.

खरच तुम्ही सर्वांनी हे एक उच्च नाटक अगदी सराईत आणि सहजपणे आम्हा मिलवॉकी करांनापेश केले.

तुम्हा सर्वांचे हे दोन्ही पैलू (IT engg,आणि अभिनय) बघुन सगळ्यांना आश्चर्य वाटत होते.प्रेक्षक नंतर येवुन विचारतात की खरच हे आपल्या सारखे IT engg आहेत ?मी एक दोन वेळा म्हणालो, नाही आपल्या सारखे साधे नाहियेत, ते निराळेच कलाकार IT इंजिनीअर आहेत

तुमची नाटकं जेव्हा पासुन मिलवॉकी मधे होत आहेत तेव्हा पासुन मला एकदा सुध्दा शिकागो चा हेवा वाटला नाहीये (सुयोगची नाटकं आणतात म्हणुन ) शप्पत…!

तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा मनोमन कौतुक ..ही प्रथा अशीच कायम चालू रहावी ही श्री चरणी प्रार्थना

आपला
समीर कुलकर्णी (मिलवॉकीकर)

===================================================

आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद!

आपले
ब्लुमिंग्टन् नॉर्मल मराठी मंडळ


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००