गणेशोत्सव २००० वृत्तांत


“इंडिया गार्डन” या रेस्टॉरंट च्या कॉन्फरन्स हॉल मधे ९ सप्टेंबर रोजी “गणेशोत्सव” साजरा झाला.

सुरुवतीला श्री. व सौ .देउस्कर यांच्या हस्ते गणपती प्रतिमेचे पूजन व आरती झाली.

अमृता माटॆ, अक्षता वैद्य, शाश्वती प्रधान यांनी सुखकर्ता दुखहर्ता ही आरती नृत्यरूपात सादर केली.

स्नेहल कदमने गणेशस्तुती नृत्यस्वरूपात सादर केली “गणराज रंगी नाचतो“. नंतर लहान मुलांचे एक कोळीनृत्य झाले.

विक्रम करंदीकरने मार्टीन ल्युथर किंग, अल गोर, महात्मा गांधी यांच्या भाषणांची झलक दाखवली आणि बा. भ. बोरकर यांची “माझ्या गोव्याच्या भूमीत” ही कविता सादर केली.

यानंतर झाला गाण्याचा कार्यक्रम शौमित्र सरदेसाई या छोट्या दोस्ताने दमदार सुरुवात केली “जयोस्तुते’ या गाण्याने. त्यानंतर सादर झालेली गाणी आणि कलाकार……….

डॉ.उदय देउस्कर तीर्थ विट्ठल क्षेत्र विठ्ठ्ल…. 
शैलेश जोशी कानडा राजा पंढ्ररीचा…….
गौरी सरदेसाई कुहु कुहु बोले कोयलीया…….  
मनोज आपटे आणि शैलेश पै इक चतुर नार…… 
मृणाल फणसळकर  सांज ये गोकुळी….
मृदुला केतकर  सोहम डमरु बाजे…….
रेवा ठाकुर, सत्यजीत शहा यांनीही गाणी सादर केली.

या कार्यक्रमला हार्मोनिअम उत्कृष्ट साथ दिली श्री.मोहन भिडे यांनी आणी तबल्यावर उत्तम साथ केली प्रविण कमलापूर यांनी.

जेष्ठ भक्ती बर्वे यांना आदरांजली म्हणून “ती फुलराणी“ या पु. ल. देशपांडे लिखित नाटकातील एक प्रवेश सौ. गौरी करंदीकर यांनी सादर केला.

अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाला विशेष सहाय्य केलं…गिरिश व मेधा कदम, रेवा व विनोद ठाकुर, प्रसन्न व माधुरी माटे, मुक्ता व सुदर्शन प्रधान, गौरी व गौतम करंदीकर, गणेश ओक, ज्योती कान्हेरे, सचीन ठोंबरे.

कार्यक्रमाची छायाचित्रे

 

 

 

 

 

 

 

 


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००