गणेशोत्सव २००१ वृत्तांत

नॉर्मल वन प्लाझा मधे दणक्यात साजरा झाला झाला. उत्साह द्विगुणीत होण्याचे कारण म्हणजे य़ंदा मंडळाला गणपतीची मूर्ती मिळाली. या मूर्तिचे मूर्तिकार आहेत ओंकार जोशी. ओंकार ने अतीशय परिश्रम आणि श्रद्धापूर्वक ही मुर्ती मंडळासाठी बनवली.

वाजत गाजत या मुर्तीचे आगमन झाले. श्री. शरद चितगोपेकर व सौ. चितगोपेकर यांच्या हस्ते श्रींची पूजा व आरती झाली.

कार्यक्रमाला सुरुवात झाली लहान मुलांच्या कार्यक्रमाने.

दीपा जोशी लिखीत, शलाका आपटे दिग्दर्शीत “एका भुताची गोष्ट” हे नाटुकले सादर केले.
या बालकलाकारांनी…… हर्षवर्धन भिडे, रेणु जोशी, निकिता कुलकर्णी, राहुल एकबोटे, देवव्रत जोशी, विक्रम करंदीकर, सानिका भिडे.

लहान मुलांच्या कार्यक्रमांबरोबोच मोठ्यांसाठी मराठी साहित्यावरील प्रश्नमंजूषा आयोजित केली होती.
प्रश्न तयार केले होते मधुरा आणि अतुल देसाई, विनोद ठाकुर यांनी. सूत्रसंचालन केले होते ज्योती कान्हेरे आणि रणधीरसिंग ठाकूर यांनी. यात सुट्टीवर आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनीही भाग घेतला.

सगळ्यांनी मिळून अल्पोपहार केला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाला स्वंयंसेवकांचे सहकार्य हवेच…. ते होते गिरिश कदम, विनोद ठाकूर, श्रीनिवास शिखरे, अतुल आठवले, मकरंद केतकर.

कार्यक्रमाची छायाचित्रे

 

 

 

 

 

 

 

 


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००