गणेशोत्सव २००८ - वृत्तांत


'गणपती बाप्पा मोरया' च्या जयजयकारात ब्लुमिंग्टन नॉर्मल महाराष्ट्र मंडळाचा ९ वा गणपती उत्सव १३ सप्टेम्बर २००८ रोजी चिडिक्स ज्युनिअर हायस्कूल मधे ४०० लोकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

अनंत व रश्मी गोखले यांच्या हस्ते गणेशपूजा झाल्या नंतर स्टेजवरील सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात मुख्यत्वेकरून लहान मुलांचा सहभाग जास्त असतो.

प्रथम श्रद्धा भिडे हिने ' ओंकार स्वरुपा' या गाण्यावर आधारित नृत्य-वंदना सादर केली. आपल्या सुंदर पदन्यासाने आणि चेहे-यावरील भक्ति-भावाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली.

यानंतर अनामय देशपांडे याने सादर केली संदीप खरेंची कविता 'हॅलो हॅलो बोलताय कोण'. सुंदर हावभाव, स्वच्छ उच्चार या मुळे ही कविता प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.

या नंतर पेश केले 'कोणास ठाऊक कसा, शाळेत गेला ससा' या गाण्यावरील नृत्य अनिश देशपांडे ,सृष्टि पाटील, अनन्या बासरकर, अन्विता लिमये, अविषी कोलते, सोनल गानु ,कौशल धुमाळ ,सिद्धि हिंदुराव या बाल कलाकारानी. हां नाच बसविला होता दीपाली देशपांडे आणि मिनल लिमये यांनी.

नंतर सादर झाले बहारदार, 'अग्गोबाई ढग्गोबाई'. यात वेद लोम्बार, अनुष्का लिमये, मल्हार कमलापुर, मीरा वाघ, आशीष ठाकुर, ऋचा खेर, मौशमी भट, अर्जुन काळे, प्रिया जोशी, आदित्य नरसाळे, मृणाल तायडे आणि चिराग बाविस्कर यानी गाण्याच्या तालावर प्रेक्षकाना नाचवले. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले होते प्राजक्ता कमलापुर आणि दुलारी ठाकुर यांनी.

पुढचा कार्यक्रम होता 'गणपती नृत्य'. यात भाग घेतला होता वैदेही पाटील, जय महाजन, रिया प्रसादे, सिद्धि गोखले, सोहन पागनीस, कुश राउत, आर्य जोशी, अथर्व पेडणेकर, रमा टोणपे आणि श्रेया मोकाशी या बाल-कलाकारानी. नृत्यदिग्दर्शन केले होते विभा महाजन आणि प्राची पाटील यांनी.

यानंतर सादर झाले नाटुकले, 'हिप हिप हुर्रे'. यात भाग घेतला होता मानसी साठे ,सुहृद राउत, श्रद्धा भिडे, रवि मालपाणी , कुणाल सामंत, आलिशा नाडकर्णी, अनामय देशपांडे, अक्षय बुचे , केयूर गोंधळेकर, राधा वाघ, श्रेया जामसंडेकर, श्रीया मालपाणी, गार्गी खेर, सानिका बुचे आणि अभिरू राउत यानी. ससा आणि कासव या जुन्या गोष्टीवर आधारित नव्या काळातले हे नाटुकले, नव्या संदर्भांसह बरोबर प्रेक्षकानी खूपच एन्जॉय केले. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले होते गौरी करंदीकर यांनी.

छोट्यांच्या कार्यक्रमानंतर सुरु झाले मोठ्यांचे कार्यक्रम. सुरुवात झाली पु. ल. देशपांडे यांच्या 'पुढारी पाहिजे' या धमाल एकांकिकेने . सादर केली होती अनिरुद्ध गोडबोले, रोमेल पारसनिस, विनोद म्हसे, स्वरुप देसाई, आशीष महाडिक, समीर चौबळ, निनाद वैद्य, गौरव चौक, उमेश बिहानी, तृप्ती शिम्पी, मंदार कुलकर्णी, मयुरेश मोडक, अभिजित रानडे, राहुल कुलकर्णी, शिवानी कोरी, योगेश सावंत आणि स्वेतश्री मुकर्जी यानी. दिग्दर्शन होते अनिरुद्ध गोडबोले यांचे.

यानंतर झाले मोठ्यांचे थिरकत्या तालावरच्या मराठी गाण्यांवरील नृत्य. या धडाकेबाज आणि वन्समोअर घेणा-या नृत्यात भाग घेतला होता पूजा कलामदानी-लक्ष्मेश्वर, सोनल शिर्के-परब, मंजिरी केदार भागवत, प्रीती हिंदुराव, स्वेतश्री मुकर्जी आणि वर्षा हरीश धुमाळ यानी.

संपूर्ण कार्यक्रमाचे खुसखुशीत अणि रंगतदार निवेदन लिहिले होते मयुरेश देशपांडे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते श्रीकांत नरसाळे आणि सोनाली पाटील यांनी.

सांस्कृतिक कार्यक्रमानंतर झाली आरती आणि अथर्वशिर्ष. त्यानंतर होता भोजनाचा कार्यक्रम. ४०० लोकांनी हसत खेळत, आनंदाने भरगच्च मेनुच्या भोजनाचा आस्वाद घेतला.

शेवटी कार्यक्रम प्रमुख सुनील मुंडले यानी सर्वांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणताही कार्यक्रम स्वयंसेवकांच्या मदतीशिवाय यशस्वी होवूच शकत नाही. यावर्षीच्या कार्यक्रमाचे स्वयंसेवक होतेः

भोजन व्यवस्था : योगेश सावंत, मयुरेश देशपांडे, उत्कर्ष कणसे, पराग पवार, अमित मनोहर, मेधा मनोहर, सचिन बुचे, हर्षद भिसे, रविन्द्र साळवी, शशांक चाळके, राजेंद्र जोशी, विशाल पाटील, रोमेल पारसनिस, मंदार कुलकर्णी, सागर पाटील, विशाल डहाळकर, साईश प्रकाश.

तिकिट विक्री : अभी शेंडे, अनंत गोखले, अश्विनी देशपांडे, चंद्रजीत पाटील, कुणाल लाड, मानसी राक्षे, नितिन महाजन, पंकज शाह, प्रसाद अथणीकर, सचिन टकले, शिव केसरे, योगेश सावंत, जयेश मोहिते, मेधा मनोहर, निखिल जोशी.

ध्वनी योजना : जयेश मोहिते, नितिन महाजन
हॉल बुकिंग : गौरी करंदीकर
सजावट : हर्शिदा हिरानी, परेश हिरानी, गायत्री बिहानी, उमेश बिहानी, उत्तम नाईक
सर्टिफ़िकेट डिझाईन : चेतना शेंडे
फोटोग्राफी : रोहन गुर्जर
पेढे : गौरी करंदीकर, सानिका चौबळ, रश्मी गोखले, सारिका मोड़क

- आश्लेषा राऊत

कार्यक्रमाची छायाचित्रे


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००