गणेशोत्सव २००९ - वृत्तांत


२९ सप्टेंबर रोजी पार्कसाईड ज्यु. हायस्कूल च्या भव्य सभागृहात गणेशोत्सव उत्साहात  साजरा झाला.

गणपती बाप्पा मोरया……! च्या घोषात आणि मंगल वाद्यांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले.

श्री. प्रसाद व सौ.शिप्रा अथणीकर यांच्या हस्ते प्रतिष्ठापना आणी पूजा झाल्यानंतर करमणुकीच्या  कार्यक्रमाला सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालक योगेश सावंत आणि मधुरा सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व वयोगटातील मुलांनी मिळून “मोरया मोरया मी बाळ तान्हे“ हा श्लोक म्हट्ला.

आजवर  ३, ४ वर्षे  गणेशोत्सवात कुणी ना कुणी लहान मुलानी काव्यवाचन सादर केले, ही परंपरा कायम ठेवत ऋजुता दुर्वासने साभिनय सादर केल्या वासंती इनामदर लिखीत तीन बालकविता…”चिडकी”. “आजारी ससोबा” आणी “माझी बाहुली”

या नंतर सुरुवात झाली नृत्यसंगीताची स्वरा केतकर, अनिष्का वाडेकर, इशा खांडेकर,  चिरांत मोर्थी, नीत्या शहा, दिया पाटील या चिमुकल्यांनी “सांग सांग भोलानाथ” या लोकप्रिय गाण्यावर नाच केला. मार्गदर्शन होते अपर्णा केतकर आणि आरती वाडेकर यांचे.

किलबील किलबील पक्षी बोलती” सादर केले अन्विता लिमये, सोनल गानू, अनया बसरकर, पुर्वा साठे, कौशल धुमाळ, केसीआ फ़र्नांडीस यांनी…मार्गदर्शन होते मीनल लिमये, अपर्णा साठे.

चचात्या चपुढ्चा चर्यक्रम चताहो……… ”चमाला तु चांग्तोसा चष्टअगो हा नाच” सादर केला वैदेही पाटील, जय महाजन, रिया प्रसादे, सिद्धी गोखले, अथर्व पेडणेकर, सोहन पागनीस, श्रेया मोकाशी, आदिती किशोर, अनुषा नाडकर्णी, ओजस डहाळकर, चैत्राली मोरे, रिया जैन या मुलांनी. मार्गदर्शन सोनाली मोकाशी, रिंकल जैन.

आम्ही ठाकरं ठाकरं. या ठसकेबाज गाण्यावर तेवढ्याच तालात आणी जोषात नाचली आर्या ठोंबरे, अनुष्का लिमये, इशा गवांदे, प्रिया जोशी, मल्हार कमलापुर, आशिष ठाकुर, अर्जुन काळे, ऋजुता दुर्वास, मीरा वाघ, मृणाल तायडे, मौशमी भट. मार्गदर्शन अनुजा दुर्वास, प्राजक्ता कमलापूर.

यानंतर सादर झाले सई परांजपे लिखीत नाटुकले…… ”भटक्याचे भविष्य”. सर्वच बालकलाकारांनीआपल्या भुमिका अगदी ठसक्यात सादर केल्या.

भटक्या             श्रेया जामसंडेकर
अवडंबर शास्त्री       सम्राज्ञी  शिंदे
राजा चक्रमदित्य     वेद लोंबार
राणीसाहेब                 आर्या जोशी
मात्राप्रसाद                राधा वाघ
गट्टु आणि मिठ्ठू   अर्जुन गुंडेवार, सोहम पाटील
दिग्दर्शन            गौरी करंदीकर
विशेष सहाय्य              शिल्पा लोंबार, श्वेता जामसंडेकर,

यानंतर सादर झाले बहारदार नृत्य “ऐका दाजीबा” ..सादर केलं  अलीशा नाडकर्णी, सानीका बुचे, श्रेया मालपाणी या त्रिकुटाने. नृत्यदिग्दर्शन शानु त्यागी.

नृत्य, नाट्य, सगळ्याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या बालकलाकारांची वेशभुषा अत्यंत सुंदर आणि अनुरूप अशी होती.

स्पंदना फौंडेशन तर्फे ब्लूमिंग्ट्न नॉर्मल मराठी मंड्ळाच्या सहकार्याने “मनाचे श्लोक” पठण स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमाला मुलांनी मनापासुन प्रतिसाद दिला. या स्पर्धेच्या निमित्ताने मनाच्या श्लोकांचे मनन, चिंतन झाले. मुलांनी श्लोक म्हणुन त्याचा अर्थ ही सांगितला. या कार्यक्रमासाठी प्रिया चौधरी यांची मदत झाली. परिक्षक होते श्री. सुधीर पै.  पारितोषिक विजेत्यांची नावे आहेत…
सृष्टी पाटील, ऋजुता दुर्वास, अर्जुन काळे, अभिरु राउत, सुहृद राउत, श्रेयस चौधरी, गौतम सप्रे, इशा गवांडे, मृणाल तायडे.

त्यानंतर सादर झाले प्रसिध्द कथाकथनकार डॉ. श्रीकांत गोडबोले यांचे कथाकथन .सुरुवतीला हलकी ,फुलकी वाटणारी पण नंतर गंभीर वळण घेणारी कथा सादर केली. श्री.श्रीकांत गोडबोले यांनी आपल्या प्रभावी संवाद्फेकीने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं.

हसता हसता एकदम गंभीर वातावरण निर्माण करणा-या यशस्वी कथाकथनानंतर पुन्हा एकदा एक नृत्यसंगीताचा कार्यक्रम झाला… “बरसो रे मेघा बरसो रे” या गाण्यावर सम्राज्ञी  शिंदे मोहक नृत्य सादर केले.

-हाड निघालय लंडनला” या एकपात्री प्रवेशांचे सहस्त्रोत्तर प्रयोग करुन मराठी रंगभूमी गाजवणारे. आणि “व-हाड्” अक्षरश: जगभर नेणारे व-हाडकार श्री.ल़क्ष्मण देशपांडे यांच्या स्मृतीला आदरांजली म्हणुन “व-हाड निघालय लंडनला” मधील छोटा प्रवेश सादर केला पिओरीआचे निखील कुलकर्णी यांनी.

सांस्कृतीक कार्यक्रमाचा समारोप झाला.. सोनल परब आणि ग्रुपने सादर केलेल्या  “कोळी डान्स” ने  सहभागी झाले होते… श्रध्दा गावडे, प्राजक्ता साळवी, रिंकल जैन, विनोद म्हसे, अनिरुद्ध गोडबोले, निनाद वैद्य, रोमेल पारसनीस, प्रणाली पारसनीस, आशिष डाहाके, अमोल परब, सोनल परब.

य़ोगेश आणि मधुरा सावंतने या संपूर्ण कार्यक्रमाचे हलकं फुलकं मिश्कील सुत्रसंचालन करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली.

नंतर  दणक्यात झाली श्रींची आरती आणि अथर्वशिर्ष.

सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

गणपती सजावट केली होती हर्शिदा हिरा्नी, गायत्री बिहानी यांनी.

प्रसादासाठी पेढे बनवणा-या भगिनी होत्या प्रीती पाटील, मुक्ता कुलकर्णी, अश्विनी पाटील, संध्या वर्मा, शिप्रा अथणीकर, गौरी करंदीकर.

कोणताही कार्यक्रम स्वयंसेवकांच्या मदतीशिवाय यशस्वी होवूच शकत नाही. यावर्षीच्या कार्यक्रमाचे स्वयंसेवक  होतेः

छायाचित्रकार       रोहन गुर्जर  

रंगमंच व ध्वनी
    मोहित पोतनीस, शिवप्रसाद केसरे, नितिन महाजन

तिकिट-विक्री
       बाळ्कृष्ण कामत, नितिन महाजन, गौतम करंदीकर, अभि शेंडे, उदय परांजपे, पंकज शहा, प्रसाद अथणीकर, युवराज सोनावणे, सचिन टकले, योगेश सावंत, अभिजित नेरुरकर, शिवप्रसाद केसरे, कुणाल लाड, निवेदिता कुलकर्णी, अक्षता कामत

भोजन-व्यवस्था
    सुदर्शन पलांडे, राहुल झगडे, साईयेश प्रकाश, समीर विजयवर्गीय, मंदार अभाळे, केदार भागवत, विशाल पाटील, अमित हेडगे, कुणाल लाड, विनोद म्हसे, पराग काजरोळकर, तरुण देवांगण, धनंजय देशकर, सचिन बुचे, हेमंत कागले, प्रसाद देशपांडे, संदीप रघुवंशी, सुनील मुंडले, नितिन महाजन, मकरंद कुरुंदकर, उदय परांजपे, नैनेश गानू, योगेश सावंत, अभिजीत शेंडे, वीणा नेरुरकर, प्राची परांजपे, सुधा राऊत, श्वेता बनसोड.

आश्लेशा राउत

कार्यक्रमाची छायाचित्रे


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००