गणेशोत्सव

ब्लूमिंग्टन-नॉर्मल मंडळाचा यावर्षीचा गणेशोत्सव कार्यक्रम २२ सप्टेंबर २०१२ रोजी केपन सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. गणरायाच्या जयघोषात आणि खास महिला-विशेष लेझीम पथकाच्या जल्लोषात गणरायाचे स्वागत करण्यात आले.  श्री. विनोद व सौ.श्वेताश्री म्हसे आणि श्री.निलेश व सौ.अपर्णा जावळकर यांनी गणपतीची प्रतिष्ठापनापूजा केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कांचन दामले व सुबोध दामले यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि त्यानंतर करमणुकीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली गणेश वंदनेने, ऋजुता दुर्वास हिने सादर केली भावपूर्ण गणेश प्रार्थना.

चांदोबा चांदोबा भागलास का या लोकप्रिय बालगीताला आधुनिक रुपात गायलेल्या चांदोबा रॉक्स या गाण्यावर नृत्य सादर केले या  चिमुकल्या रॉकर्सनी..... सारा कुलकर्णी, अनुष्का शेष, रिया गायकवाड, ध्रुव दळवी, विहान विजयवर्गीय, अभिन्न सरकार, रोनक पोतनीस, वेद भट आणि अमेय  इदाते.  

मैया यशोदा या गाण्यावर बहारदार नृत्य करणाऱ्या गोपिका होत्या, दिया पाटील,पूर्वा साठे,निधिशा पेजथाया, तन्वी मून, सिद्धी हिंदुराव आणि शैवी वानखेडे.  कृष्णाची भूमिका केली सुमेध पानस्कर  याने.

पुढचा कार्यक्रम होता चिंटू चित्रपटातील वानरवेडे वॉरिअर” ह्या गाण्यावर धमाल नृत्य. यातील क्रिकेटपटू होते जय महाजन, श्लोक किणिकर, मल्हार  तावरे, अनमोल  कर्णिक, अक्षत शहा, यश राणे, चिन्मय शेंडे, कौशल धुमाळ, दीप महाजन, सान्वी शहा, मिहीर कुलकर्णी.

महाराष्ट्राच्या लोकागीतांमधील गणपतीस्तुतीची एक झलक बघायला मिळाली "गणपती माझा नाचत आला" या गाण्यावरील नृत्यामध्ये. यात भाग घेतला होता आर्या ठोंबरे, ऋजुता दुर्वास, सृष्टी पाटील, मौशमी  भट, ग्रीष्मा राऊत, मानसी किणीकर आणि प्रिया जोशी या बालकलाकारांनी.

लहान मुलांच्या गटातील शेवटचा कार्यक्रम होता गणपती श्लोकावर आधारित भरतनाट्यम नृत्य. सादर केले अवनी अयंजी हिने.

यानंतर लहान मुलांसाठी अल्पोपहाराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

मोठ्यांच्या कार्यक्रमांची सुरुवातही गणेश वंदनेनी करण्यात आली. दीप्ती शेट्ये यांनी सादर केले "गणराज रंगी नाचतो" या गाण्यावर एक नृत्य.

दरवर्षीची परंपरा जपत या वर्षीही एक मनोरंजनात्मक विनोदी नाटिका सादर करण्यात आली. नाटिकेचे नाव होते "एका लग्नाची भलतीच गोष्ट", दिग्दर्शन केले होते गौरी करंदीकर यांनी. यातील कलाकार-- विनोद म्हसे, अनिरुद्ध गोडबोले, मंदार कुलकर्णी, पराग काजरोळकर, स्वप्नील राऊत, रोमेल पारसनीस  आणि सुखदा खोंबारे.

यापुढचे "Once More"  मिळवणारे धमाकेदार नृत्य सादर केले, रिटा बायस, शिल्पा पतंगे, पायल अग्रवाल, निहारिका देसाई, प्रियांका गजभे, तन्वी कासार , अमोल मुजुमले, विशाल कुलकर्णी, विश्वनाथ बोऱ्हाडे, रोहन नाईक यांनी.

या नंतर अमृता माटे आणि प्रियांका श्रोत्रीय यांनी पंडित बिरजू महाराज यांनी कंपोझ केलेल्या तराना वर कथ्थक नृत्य सादर केले.

नृत्य आणि चित्रकारिता यांचा अनोखा मेळ घालत एक धमाकेदार  नृत्याविष्कार सादर केला  कुलदीप शर्मा , लक्ष्मी विजयवर्गीय,तृप्ती शिंपी,संदीप कुमार सिंग, दीपक महेश्वरी, रोहित मनुजा, आणि अर्जुन काळे  यांनी. गणपती स्तुती आणि गणपती आरती यांच्या सुरेख Remix च्या  तालावर नृत्य करत असताना, कोऱ्या कॅनव्हास वर सुबक Brush Stroke करून कलाकारांनी गणपती बाप्पाचे मोहक रूप रेखाटले.

सांस्कृतिक कार्यक्रमानंतर श्रीगणेशाची आरती आणि अथर्वशीर्ष  झाले. श्रीगणेशाच्या दर्शनानंतर सर्वांना  मोदकांचा प्रसाद देण्यात आला.

उत्सव कलागुणांचा जल्लोष मायबोलीचा...! या ब्रीद वाक्यासह आपल्या मंडळाचा नवीन banner गणेश पूजनाच्या या शुभदिनी झळकला. Banner चे art work केले  अभिजीत कर्णिक यांनी, संकल्पना --आदिती साठे. विशेष सहाय्य विनोद ठाकुर. गणेशोत्सवाच्या जेवणात आपण मेधा कदम व  प्रिया पटवर्धन या दोघीं मुळे पुरणपोळीचा बेत करू शकलो. मंडळाचे सदस्य भारतात परत गेले तरी मंडळाशी असलेले ऋणानुबंध कायम ठेवतात आणि मंडळासाठी काम करत रहातात याचा हा सुखद आणि अभिमानास्पद अनुभव.

या वर्षीच्या  "Dinner Box"  चा पुरण पोळी, साजूक तूप , मटकीची उसळ , भात आणि पुरणाचे मोदक असा  खास मराठमोळा बेत होता.    मंडळाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावणारे उत्साही स्वयंसेवक होते......

कार्यक्रम व्यवस्थापक

अनंत गोखले

गणरायासाठी  मखर , सजावट

शिरीष राणे, सुरेश मालन, तुकाराम खाडे

कार्यस्थळ व्यवस्था

गौरी करंदीकर

तिकीट  विक्री

उदय परांजपे, गौतम करंदीकर, अभिजित नेरुरकर, निवेदिता  कुलकर्णी, 

ध्वनी ,पार्श्वसंगीत

आशिष डहाके, मोहित पोतनीस

भोजन व्यवस्था

विनोद म्हसे, श्वेताश्री म्हसे, प्रगती प्रसाद, राहुल पतंगे, सिद्धार्थ खाडे, स्वप्नील राऊत, इंद्रायणी मिर्गे, रोहन नाईक, गणेश भदाणे,दिशी गर्ग ,शानू त्यागी,    प्राची पटवर्धन, विश्वनाथ बोऱ्हाडे

मोदक -प्रसाद

श्रुती  डहाके ,  वर्षा  धुमाळ , सोनाली पाटील ,निधी किणीकर, लीना ठोंबरे , राजश्रीताई जोशी ,मनीषाताई गोखले, कांचन दामले, मीनल शहा, इंद्रायणी मिर्गे, दिशी गर्ग ,प्राची परांजपे,सोनाली कर्णिक, दिप्ती तावरे, अदिती  दळवी,अनुप्रिया कालकुंद्री

फोटोग्राफी

प्रसाद राजाराम

वृत्तांकन -- कांचन दामले.

कार्यक्रमाची छायाचित्रे

व्हीडीओ गॅलरी

धन्यवाद,
आपले
ब्लुमिंग्ट्न –नॉर्मल मराठी मंडळ


============================================================





कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००