गणेशोत्सव

आपल्या  मराठी मंडळाचा १४वा गणेशोत्सव १४ सप्टेंबर २०१३ रोज़ी केपन सभागृहात मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा झाला . लेझीमच्या तालावर आणि 'गणपती बाप्पा मोरया ' च्या गजरात गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले.

दीपिका आणि स्वप्निल राऊत,  व सौ. गायत्री आणि गणेश भदाणे यांच्या हस्ते गणेशपूजा झाल्यानंतर सांस्कृतिक आणि करमणुकींच्या कार्यक्रमांची सुरूवात झाली.

सुखदा खोम्बारे हिने सर्व उपस्थितांचे स्वागत केले. प्रचीती कुलकर्णी आणि निषाद भाटवडेकर यांनी 'गणेशवंदन' सादर केले.

ऋजुता दुर्वास हिने 'परी आणि दगड' आणि 'लपंडाव' या दोन कविता सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.

या नंतर शर्वरी किर्दंत, किमया घाटपांडे, प्रचीती कुलकर्णी, माही झगडे, निषाद भाटवडेकर, राजस पाटील, ओजस गानू आणि जय मोकाशी या बालगोपालांनी 'कित्ती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला' या गाण्यावर नृत्य सादर करून बाप्पा जवळ गोड कमी खाण्याचा हट्ट् केला. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले होते प्रिती पाटील यांनी.

चिंटु चित्रपटातील 'स स स सुट्टी' या गाण्यावर अनुष्का शेष, सारा कुलकर्णी, निकिता कोळेकर, निमीता कोळेकर, रिया गायकवाड, विहान विजयवर्गीय, अभिन्न सरकार, रोनक पोतनीस, मिहीर कुलकर्णी आणि ध्रुव दळवी या बालकलाकारांनी धमाकेदार नृत्य सादर केले. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले होते लक्ष्मी विजयवर्गीय यांनी. 

या नंतर महाराष्ट्रातील कोळी मंडळी आपल्या भेटीला आली ती सानवी शहा, गार्गी राऊत, हर्षल जोशी, दिप महाजन, ऋजुला मुसळे, सोहम मेहता यांच्या रुपात. पूनम राउत यांच्या मार्गदर्शना खाली हे सुरेख कोळी नृत्य सादर केले गेले. 

या नंतर अनिष देशपांडे, जय महाजन आणि ऋजुता दुर्वास कंपनीने गौरी करंदीकर लिखित चिंटुच्या नाटुकल्याची धम्माल उडवून दिली. दिपाली देशपांडे यांनी या नाटुकल्याचे दिग्दर्शन केले होते.

अन्विता लिमये हिने “छान छान मनीमाऊचं बाळ” हे गोड बालगीत गाणं गाऊन सर्वांची कौतुकाची थाप मिळवली तिला पेटीवर साथ केली होती श्री. प्रसन्न माटे यांनी.

ABCD या चित्रपटातील 'देवा श्रीगणेशा' या गीतावर शारिनी मेनन, तान्या शंकर, सिध लाड, हिया बरई, मल्हार तावरे, श्रेणी जैन या कलाकारांनी बहारदार नृत्य सादर केले.  

'अफजलखानाचा वध' ही नाटीका सादर करून सोहम पाटील, अक्षत शहा, ऋषील पतंगे, वेद लोंबर, श्लोक किणीकर या कलाकारांनी  प्रेक्षकांच्या मनात शिवरायांची आठवण ताजी केली.  

ग्रीष्मा राऊत, मानसी किणीकर, ऋजुता दुर्वास, रिया प्रसादे, सोनल गानु, श्रेया मोकाशी, प्रिया जोशी, सिद्धी हिंदुराव, अनिष देशपांडे आणि यश राणे या बच्चेकंपनीने बालक पालक या चित्रपटातील 'सुसंगती सदा घडो' या गीतावर कल्ला करत बालकलाकारांच्या कार्यक्रमाचा आठवणीत रहावा असा समारोप केला. 

लहान मुलांनी सादर केलेल्या एका पेक्षा एक कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या मनात मोठ्यांच्या कार्यक्रमासाठी चांगलीच उत्सुकता निर्माण केली होती. सर्वप्रथम .”मिडीयाच्या नानाची...!” या स्कीट मधून Idiot Box च्या दुष्परीणामांवर बेरकी टीका सादर केली गेली आणि प्रेक्षकांत चांगलीच खसखस पिकली. कलाकार होते अनंत गोखले , सुखदा खोम्बारे , मीनल गुर्जर , मीनल शहा , प्रगती प्रसाद , सोनाल पाटील, अमृता प्रभू  आणि निधी किणीकर

अनिरुद्ध आणि गणेश अनबुले यांच्या रजनीकांत Vs राजकुमार ने सभागृहात चांगल्याच टाळ्या मिलवल्या.

अक्षय साटम आणि सचिन पाटील यांच्या 'आबुबुराव आणि बाबुरावां'नी सर्वांना बतावणी या लोककलेची एक छोटीशी रंगतदार झलक दाखविली. 

नेहा चौक यांनी गायलेल्या 'येऊ कशी कशी मी नांदायला' या लावणीवर सर्वांनी ताल धरला.

यानंतर अविनाश भाटवडेकर यांनी 'तुज मागतो मी आता', 'जीवनके सफरमे राही' आणि 'रूठ ना जाना' ही गाणी शिट्टीवर सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. 

या नंतर अनिरुद्ध आणि अनंत गोखले यांनी 'वकील- अशील' ही हास्याची कारंजी फुलवणारी नाटीका सादर केली. 

या सर्व बहारदार कार्यक्रमावर कळस चढला तो आपल्या मराठमोळ्या  'दिंडी'ने. गौरी करंदीकर यांच्या संकल्पना, कुलदीप शर्मा यांचे नृत्यदिग्दर्शन, अनुजा दुर्वास आणि श्रुती डहाके यांनी  बनविलेले उत्कृष्ठ  props या सगळ्याला  रंगमंचावर २९ कलाकारांची चोख साथ मिळाली आणि एक अविस्मरणीय कलाविष्कार सादर झाला .अगदी  once more बघताना सुद्धा प्रेक्षकांच्या  अंगावर रोमांच उभे राहिले . या दिंडीतील कलाकार होते अंकुश मुखेडकर, अक्षय साटम, आकाश परांजपे, अनुराग, विराज राऊळ , दीपक महेश्वरी, सचिन पाटील, निलेश जावळकर, अनामिका बेरड, पल्लवी निकम, नीलम चिमोटे, दीपिका राऊत, चैताली भाटवडेकर, प्रणाली पारसनीस, अपर्णा जावळकर आणि अलका लखोटे, तर वारकरी होते नागेश गालपल्ली, गौरव चौक, विनोद म्हसे, स्वप्निल राऊत, गणेश अनभुले, दिप्ती तावरे, कल्याणी गोप, रेश्मा अनभुले आणि श्रद्धा मुखेडकर. 

आशिष- श्रुती डहाके आणि चिन्मय शेंडे यांनी अनुक्रमे विठ्ठल- रुक्मिणी आणि गणपतीच्या रूपात प्रेक्षकांना दर्शन दिले.

सांस्कृतिक कार्यक्रमानंतर श्रीगणेशाची आरती आणि अथर्वशीर्ष  झाले. श्रीगणेशाच्या दर्शनानंतर सर्वांना मोदकांचा प्रसाद देण्यात  आला. या वर्षीच्या “Dinner Box” चा बेत होता मोतीचूर लाडू, पुरी +भाजी , काकडी कोशिंबीर आणि पुलाव .

कार्यक्रम यशस्वी करणारे उत्साही स्वयंसेवक होते......

कार्यक्रम व्यवस्थापक अनंत गोखले
गणरायासाठी मखर सजावट शिरीष राणे, सेजल राणे, सुरेश मालन,
कार्यस्थळ व्यवस्था गौरी करंदीकर
तिकीट  विक्री उदय परांजपे, गौतम करंदीकर, अभिजित नेरुरकर, निवेदिता  कुलकर्णी, अभी शेंडे
ध्वनी पार्श्वसंगीत मोहित पोतनीस, स्वप्नील कारखानीस
भोजन व्यवस्था श्वेताश्री म्हसे, समीर आणि शर्मिला आगरकर ,सिद्धार्थ आणि पल्लवी खाडे,  गणेश आणि गायत्री भदाणे, आदिती दळवी ,सीमा मोटवानी , निवेदिता कुलकर्णी ,सुबोध पटाले
मोदक -प्रसाद श्रुती  डहाके, अपर्णा जावळकर , गायत्री भदाणे , दीपिका राउत,चैताली भाटवडेकर , 
फोटोग्राफी प्रसाद राजाराम

वृत्तांकन – चैताली भाटवडेकर

कार्यक्रमाची छायाचित्रे
व्हीडीओ गॅलरी

धन्यवाद,
आपले
ब्लुमिंग्ट्न –नॉर्मल मराठी मंडळ


============================================================





कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००