गणेशोत्सव २०१७

२७ August रोजी Capen Auditorium मध्ये मंडळाचा १८ वा गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. सनईच्या सुरात आणि मोरयाच्या जयघोषात श्रींचे आगमन झाले.

प्रथेप्रमाणे अक्षय आणि पूजा साटम या नवविवाहित दाम्पत्यानी श्रींची स्थापना आणि पूजा केली.

गणेशपूजना नंतर सूत्रसंचालक साईप्रसाद जोशी आणि अभिजीत कुलकर्णी यांनी खुमासदार निवेदन करत कार्यक्रमाची सुरुवात केली .

अगोबाई ढगोबाई आणि जय मल्हार या गाण्यांवर देखणा नाच केला रेयांश म्हसे, अद्वय आगरकर, ईवाना पारसनीस, कस्तुरी चौधरी, नैशा बिरकोडी, अमोघ भालेराव, अर्णव चौक, विहान मंगरूळकर, अनय डहाके, आरुष काजरोळकर, जीतसी कुलकर्णी, विआन डोळ, क्षितिजा कुंचूर, कबीर चिमोटे, रिआन चौहान, अनाहि शर्मा, अक्षज वर्मा, अभिराज पाठक या बालकलाकारांनी. याच नाचात तीन मुलांनी खास एंट्री घेऊन सरप्राईज दिले... गणपती : शर्मन गोखले खंडोबा : अबीर पारसनीस म्हाळसा : अवनी दळवी. Group coordinator होत्या स्वेताश्री म्हसे .

यानंतर धृती जोशी ने सिंथेसाइझर वर गजानन श्री गणराया हे गीत उत्तम रित्या सादर केले. मार्गदर्शन होते प्रसन्न माटे यांचे.

गणपतीच्या कार्यक्रमात यंदा एक बाल गणेश मंडळ अवतरले.... शंकरजी का डमरू बाजे हे सुंदर नृत्य घेऊन, विहा बापट, शर्मन गोखले, अबीर पारसनीस, अवनी दळवी, अन्वी रोटकर, अन्वी जोशी, तेज शहा, अनुषा पाटील, मिहिका चंदगडकर, नील कुंभार, वैष्णवी तिवारी, आर्या खोत, क्रीशा पाटील, मिहीर पोतनीस या बाल गणेशांना वन्स मोअर देत प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली. Choreography: दिव्या पाटील, प्रणाली पारसनीस Coordinator: रश्मी गोखले

ध्रुव दळवी, अन्वय जोशी, शर्वरी किर्दंत, जय मोकाशी, अनघा जाधव, आर्यन काळे, शौर्य जैन या गुणी मुलांनी कट्यार मधले शिव भोला भंडारी हे दमदार गाणे निवडून त्यावर जोषपूर्ण नाच सादर केला. Choreography: मोहिनी दुरूगकर, विनिता जोशी Coordinator: अदिती दळवी

"दिल है छोटासा छोटीसी आशा" हे सदाबहार गाणे सादर केले श्रेया मोकाशी, मौलिक गर्ग यांनी, मार्गदर्शन होते नेहा चौक यांचे.

गणपती बाप्पा मोरया... या रे या सारे या म्हणत कुश राऊत, श्रेया मोकाशी, अनन्या जोशी, सिद्धेश चेकुरी, श्रुतिलया वेंकटसुब्रमणियन, शारीनी मेनन, संकल्प बोरा यांनी जोरदार एंट्री घेतली आणि व्हेंटिलेटर या चित्रपटातल्या धमाल नाच केला. Choreography: शर्वरी जोशी

" हे गजवदना " ---सलील कुलकर्णी आणि अनेक नामवंत गायकांनी गायलेली ही सुंदर गणेशस्तुती कमला नरसिंहराज, क्रिशी कुंदुरी, निधीशा पेजथाया, पुण्या सुरेश, श्रुती वदरू यांनी तितक्याच कौशल्याने सादर केली. Coordinator & Choreography दुलारी ठाकूर & श्वेता राव-पेजथाया

यानंतर भरतनाट्यम सादर केले अनघा जाधव, अक्षया कोरा, अक्षरा कोरा, अन्या नारा, तुलसी खेडकर, ब्रिन्दा मुद्दा, रिशा माने, साधना कुगन, वैष्णवी तिवारी, अनिका पणीकर या कलाकारांनी. Coordinator & Choreography: दुलारी ठाकूर & श्वेता राव पथेजया

यानंतर सुधा कवलगुंठा यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम शिकत असलेल्या ऋजुता दुर्वास, मनसा चेन्ना, रोजोलीनी सॉक्रेटीस, आईनस्टीनिया सॉक्रेटीस या विद्यार्थिनींनी गणेशस्तुती सादर केली.

लहान मुलांच्या कार्यक्रमा नंतर गाण्यांची मेजवानी सादर झाली.

सीमा बेंद्रे :  मन मंदिरा तेजाने !
विक्रम चिमोटे आणि सीमा बेंद्रे:  सर सुखाची श्रावणी !
नेहा चौक :  ये मेरा दिल प्यार का दिवाना! 
सीमा बेंद्रे :  रेशमाच्या रेघांनी 
नेहा चौक आणि अर्चना मंगरूळकर :  कजरा कजरा मोहोबतवाला 
विक्रम चिमोटे:  सूर निरागस हो
अर्चना मंगरूळकर : उडी नींदे आँखोंसे! 
विक्रम चिमोटे:  Fusion from सैराट ( याड लागलं-झिंगाट)
समूह गान :  देवा श्रीगणेशा! (अवधूत नाडकर्णी) 

समूह नृत्य : Group Dance: अक्षय साटम, ओंकार शिरोडकर, अक्षरा शिरोडकर ओवी सुंभाते, विनिता जोशी मोहिनी दुरूगकर

गणपती उत्सव म्हणजे ढोल ताशा पाहिजेच, कार्यक्रमाची रंगत वाढवत मंडळाचे पथक दाखल झाले सगळ्याउपस्थिताना ताल धरायला लावून ढोलाच्या तालावर नाचवणारे वादक होते रोमेल पारसनीस, वल्लरी जोशी, रश्मी गोखले, चेतन कुलकर्णी, ताशा-- गणेश भदाणे, वसुधा भालेराव झांजा ---, अमोल होशिंग, सीमा बेंद्रे ढोल पथका पाठोपाठ लेझीम पथकही दाखल झाले त्यात सहभागी होते, विनिता जोशी, मोहिनी दुरुगकर, ओवी सुंभाते, श्री बो-हाडे काका, हेमंत काळे. या नंतर सामुहिक आरती झाली.सर्व गणेशभक्तांनी गणरायाचे दर्शन आणि मोदकांचा प्रसाद घेतला.

अस्मिता राऊत यांनी गणरायासाठी सुंदर मखर सजावट केली होती.

या यशस्वी कार्यक्रमा मागे परिश्रम करणारे स्वयंसेवक होते.

तिकीट विक्री: प्रसाद देशपांडे,  सुशील दुर्वास
भोजन व्यवस्था: अनंत गोखले, प्रसाद देशपांडे,  सुशील दुर्वास, , 
कार्यस्थळ व्यवस्था: अनंत गोखले,  रश्मी गोखले,  अमोल होशिंग,  अन्वेष जोशी, आशिष डहाके,  क्रांतीकुमार राऊत,, अक्षय साटम, विनोद म्हसे,  स्मिता गोडसे, साईप्रसाद जोशी
ध्वनी संयोजन: योगेश बेंद्रे,  अन्वेष जोशी
फोटोग्राफी: केदार कुंचूर,  क्रांतीकुमार राऊत, आनंद जाधव,  अमोल डोळ
मोदक प्रसाद: रश्मी गोखले,  पूजा साटम, सोनाली मोकाशी, स्मिता गोडसे, श्रुती डहाके

कार्यक्रमाची सांगता झाली रुचकर भोजनाने. TO GO Dinner Box मध्ये, गुलाबजाम, नवरतन कुर्मा, नान पुलाव, रायता असा बेत होता.

गणपतीबाप्पा मोरया..! पुढच्यावर्षी लवकर या..! अशा गजरात कार्यक्रम संपन्न झाला !

धन्यवाद,
आपले
मराठी मंडळ ब्लुमिंग्ट्न - नॉर्मल

छायाचित्रे 

व्हीडीओ गॅलरी


============================================================





कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००