कार्यक्रम २००२ - पाडवा


१४ एप्रिल रोजी हेडन ऑडीटोरियअम मधे ब्लुमिंग्टन मरठी मंडळाचा पाडवा साजारा झाला

मनोहर काटदरे लिखित गौतम करंदीकर दिग्दर्शीत “गोंधळात गोंधळ” या ३ अंकी तुफान विनोदी नाटकाने. नाटकाचे थोडक्यात कथानक असे…


सदानंद झुंझार आणि सौ. सविता झुंझार यांचा गिरगांवात एक ब्लॉक तर बोरिवलीला बंगला.नोकरी साठी सोमवार ते शुक्रवार झुंझार दांपत्य गिरगांवात आणि वीकएंडला बोरिवलीला असे रहात असत…… सज्जन खरे नावाचा तसा सभ्य सुशिक्षित तरुण ,नोकरी आहे पण मुंबईत रहायला जागा नाही.या अडचणीवर चतुराईने तोडगा काढतो.. झुंझारांच्याच दोन्ही घरात आलटून पालटून.. म्हणजे वीकएंडला गिरगांव आणि इतर वारीत्यांच्याच बोरिवलिच्या बंगल्यात रहात असे.

बरेच महिने हे बिनबोभाट चालु रहाते पण….एकेदिवशी सविता. त्याच त्या रुटिनचा कंटाळा आला आहे असे सांगुन.. वीकएंडला बोरिवलिला जातच नाही…सदानंद झुंझार एकटेच बोरिवलीला जातात….गिरगांवच्या घरात नेहमी प्रमाणे सज्जन खरे येतो .प्रथम तो चोर असावा असे वाटून सविता घाबरते…….पण खरंतर घाबरगुंडी उडालेली असते सज्जन खरेची….कारण नेमकं त्याच दिवशी त्याने त्याच्या प्रेयसीला घरी बोलावलेले असते… सौ.झुंझार ना सगळी कल्पना देउन विनंती करुन ते घर सज्जनचच आहे असे आजच्या पुरते नाटक करायला कसतरी तयार करतो.. प्रेयसी मधु येते ..ते घर सज्जनचे आहे या समजुतीत खुष असते…… मधुचे वडील काही कारणाने त्याच भागात आलेले असतात ..ते मधुला या इमारतीत शिरताना पहातात आणि ती इकडे कशी हे पहायला ते ही घरात येतात….त्यांना पाहुन मधु स्वयंपाकघरात लपते….सविता आणि सज्जन खरे हे आपण पतिपत्नी असुन हे घर त्यांच आहे असे मधुच्या वडीलांना सांगुन त्यांना इथून घालवायला बघतात…..या प्लॅन मधे ते यश्स्वी होतच असतात ..तेवढ्यात सदानंद चा बॉस काही कारणाने घरी येतो…पाठोपाठ स्वत: सदानंद येतो…. सविताची मैत्रीण मृदुला कोकिळकंठी येते….आणि गोंधळ वाढतच जातो…..हे एवढ कमी म्हणुन की काय त्या भागातला सॅनीटरी इन्स्पेक्टर येतो त्याला पोलिस इन्स्पेक्टर समजुन सगळे गोंधळात आणखी भर घालतात… शेवटी खरा पोलीस हवालदार येतो आणि गोंधळ मिटतो…….…मधु आणि सज्जनच्या प्रेमविवाहाला वडील अनुमती देउन शेवट गोड करतात

हा गोंधळ घालणारे कलाकार होते….

सविता झुंझार    गौरी करंदीकर
सदानंद झुंझार    प्रसन्न माटे
सज्जन खरे       राहुल शिंदे
उदबत्ती विक्रेता     विक्रम करंदीकर
मधु           दीपा जोशी,
मधुचे वडील      चंद्रशेखर वझे
बॉस        अभिजीत नेरुरकर
मृदुला कोकिळकंठी    मेधा कदम
सॅनिटरी इन्स्पेक्टर   विशाल डहाळकर
हवालदार            ओंकार जोशी
नेपथ्य            ओंकार जोशी, गिरिश कदम
विशेष सहाय्य      माधुरी माटे, अमृता माटे

या वर्षी नाटकाला सेट मिळाला….तो अतीशय परिश्रमाने आणि युक्तीने तयार केला ओंकार जोशी आणि गिरिश कदम यांनी.

दुसरे वैशिष्ठ्य ..या नाटकासाठी सुयोग्य असे शिर्षक गीत लिहले होते चंद्रशेखर वझे यांनी आणि स्वरबद्ध केलं होत शैलेश जोशी यांनी.

या नाटकाचे मिलवॉकी, सेंट्लुईस, सिनसिअनाटी या ३ ठिकाणीही दर्जेदार प्रयोग झाले.

नाटकाचे पोस्टर

कार्यक्रमाची छायाचित्रे