कार्यक्रम २००६ - पाडवा


गुढीपाडवा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त. हिंदूंचे नववर्ष या दिवसापासून सुरू होते. व्लुमिंग्टन् नार्मल मराठी मंडळाने आपल्या दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे या वर्षीदेखील गुढीपाडव्याला एक छानसे नाटक सादर केले. सुप्रसिद्ध नाटककार कै. वसंत कानेटकर लिखित गोष्ट जन्मांतरीची हे दोन अंकी नाटक या वर्षी सादर करण्यात आले. दिग्दर्शन होतं अर्थातच श्री. गौतम करंदीकर यांचे.

नियती हे एक न उलगडलेले कोडे. या नियतिचे किती विचित्र योगायोग असू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे नाटक. नियतीचे हेच अनाकलनीय योगायोग आणि माणसाकडून ते थांबवण्यासाठी केलेला अटोकाट प्रयत्न असं काहीसं गंभीर स्वरूप या नाटकाचं होतं.

मानवाकडून नियतीचे हे विचित्र योगायोग आटोक्यात आणण्याचं अवघड काम करणारी डॉ. विश्वामित्र यांची प्रमुख भूमिका साकारली होती राजेंद्र भिडे यांनी. याशिवाय प्रसन्न माटे यांचा दयानंद कोलारकर, अश्विनी देशपांडे यांची प्रफुल्ला, गौरी करंदीकर यांनी साकारलेली माणिक सातपुते या भूमिका खरोखरच उत्तम अभिनयाचे नमुने होते. सुनिल मुंडले, सचिन बुचे, सागर काचोळे, अजय देशपांडे आणि दिलीप पवार या सर्वांनीच आपापल्या भूमिका चोख पार पाडल्या.

नाटकाला अनुरूप संगीत दिलं होतं वासुदेव कारूळकर यांनी, तर साजेसं नेपथ्य उभारलं होतं दिलीप पवार, विनोद ठाकूर आणि रणजीत जोशी यांनी. प्रकाशयोजना होती मयुरेश देशपांडे आणि जयेश मोहिते यांची. या वर्षीच्या प्रकाशयोजनेचे वैशिष्ट्य असे की, मंडळाने स्वतः खरेदी केलेले लाईटस् आणि डिमर्स वापरले होते.

नाटक पार पाडण्यासाठी त्यात केवळ नाटकाचा संचच पुरेसा नसतो तर ही सर्व धुरा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कित्येकजण झटत असतात.

संदीप गोरे, अमोल बर्वे, नचिकेत सरदेसाई यांनी व्हिडीओ रेकोर्डिंग केले तर प्रसाद दैठणकर यांच्याकडे फोटोग्राफ़ीची जबाबदारी होती.

नाटकाच्या तिकीट विक्री व्यवस्थेकडे लक्ष दिले होते अभिजित नेरूरकर, प्रमोद होले, अविनाश टकले, श्रीस्वरूप जोशी, गौतम करंदीकर, दिलीप पवार, प्रसन्न माटे, रणजीत जोशी व सुनील मुंडले यांनी. तर कार्यक्रम व्यवस्था पाहिली होती निलेश कुलकर्णी, निलेश ताम्हाणे, सुधीर पै, रोहन रानडे, नितीन शिंदे, श्रीस्वरूप जोशी, पंकज कुदळे, अनुराधा गोरे व इशा दंडवते यांनी. सगळ्यात महत्वाचे म्हणजे नाटक प्रेक्षकांना बिनघोरपणे पहाता यावे यासाठी बच्चे कंपनीला सांभाळण्याचे अर्थात बेबीसिटींगचे काम पाहिले होते सोनाली परांजपे, मृण्मयी देशपांडे, वेदवती गोखले, पंकज गोखले आणि नंदिनी पुसाळकर यांनी.

व्लुमिंग्टन् नार्मल व्यतिरीक्त सेंट लुई आणि मिलवॉकी येथेही नाटकाचे यशस्वी प्रयोग झाले.

-अमृता सहस्त्रबुद्धे

नाटकाची छायाचित्रे   

नाटकाचे पोस्टर



कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००