पाडवा

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी.......! जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!

चैत्रपालवी, गुढीपाडवा, आणि पंधरावे मराठी नाटक, इतकेच नव्हे तर सुवर्ण महोत्सवी म्हणजेच पन्नासावा प्रयोग हे भाग्य ब्लुमिंग्टन् नॉर्मल मधील मराठी मंडळीना लाभले.

सुरेश जयराम लिखित आणि गौतम करंदीकर दिग्दर्शित ‘चेकमेट’ हे मराठी नाटक १८ एप्रिल रोजी हेडन ऑडिटोरीयम मधे सादर झाले.

मंदार कुलकर्णी याने उपस्थितांचे स्वागत केले आणि नांदी च्या स्वरांनी वातावरण भारावून गेले.

नाटकाचे थोडक्यात कथानक असे…
निशा चौगुले ही करोडोंची मालकीण पण संपूर्ण कुटुंब विमान अपघातात गेल्याने एकाकी आयुष्य जगत असते त्याच वेळी तिच्या आयुष्यात रणजीत परदेशी नावाची व्यक्ती येते. रणजीत ला दारू आणि जुगाराचे प्रचंड व्यसन आहे आणि त्यापायी झालेली देणेक-यांची देणी चुकती करण्यासाठी त्याला निशाचा पैसा हवा असतो.त्या पैशासाठी निशाला लग्नाच्या जाळ्यात फसवतो पण आता रणजीतच्या वागण्याला निशा कंटाळून गेलेली असते.

अश्यातच रणजीत परदेशी याची सेक्रेटरी रीटा, निशा चौगुलेना तिच्या प्रियकरा विषयी सांगते. त्याचे नाव अभिजित परदेशी,जो रणजीत चा अगदी त्याच्याच सारखा दिसणारा जुळा भाऊ असतो,. रणजीतच्या व्यसनाला कंटाळलेल्या निशाला रणजीत पासून घटस्पोट हवा असतो पण रणजीत सहजासहजी घटस्फोट देणार नाही याची खात्री असल्याने, हुबेहूब रणजीत सारख्या दिसणा-या आभिजित चा वापर करून रीटा च्या मदतीने निशा एक कट रचते. आणि रणजीत चे वकील मित्र रुद्राप्पा यांना घटस्फोटाचे कागदपत्र तयार करायला सांगते.

आपला नियोजित कट नक्कीच यशस्वी होईल असे निशा चौगुलेना वाटते पण घडते भलतेच रणजीत, रीटा, व रुद्रप्पा हे निशा चौगुलेनाच सापळ्यात अडकवतात. घाबरलेली निशा मदती साठी पोलिसाना बोलावते पण मदतीसाठी आलेले इन्स्पेक्टर सूर्यवंशी. सगळा प्रकार पाहून चक्रवतात, आणि निशाचे म्हणणे खोटे ठरवतात.

प्रेक्षकामध्ये उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच पर्दाफार्श होतो आणि समजते की निशा चौगुले या सामान्य व्यक्ती नसून सीआयडी इन्स्पेक्टर आहेत. आपल्या मैत्रिणीचा आणि आणखी दोन निष्पाप स्त्रियांचा खून केलेल्या आरोपींना म्हणजेच रणजीत,रिटा,आणि रुद्रप्पाला रेडहँड पकडण्यासाठी त्यानी हे नाटक केलेले असते.

गौतम करंदीकर यांच्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने नाटकातील प्रसंग रंगत गेले, कलाकारांच्या अद्वीतीय कामगिरीने शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. कथेचा शेवट असा असेल याची शंकाही शेवटपर्यंत आली नाही.
या नाटकातील निशा चौगुले ची भूमिका साकारली होती गौरी करंदीकर यांनी. भावनांचा आवेग, कल्लोळ हा अगदी सहजरीत्या त्यांनी सादर केला. त्यांचा वावऱ सुरवातीपासून ते शेवटपर्यंत अत्यंत लक्षवेधक होता. आपल्या अभिनय कौशल्याने त्यांन निशा चौगुलेची व्यक्तिरेखा छान खुलवली.

पराग काजरोळकर याने रणजीत परदेशी व अभिजित परदेशी हा डबलरोल अप्रतिम रीत्या सादर केला. परागचे संवादाचे टायमिंग, रंगमंच्यावरचा वावर विशेष उल्लेखनीय होता. अभिजीतचा भोळेपणा आणि रणजीतचा मस्तवालपणा त्याने लीलया दाखवला, आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवला.

सेक्रेटरी रीटाची भूमिका रेखा गायकवाड हिने सुंदर रीत्या सादर केली. आवाजातील चढउतार, आणि हावभाव कौशल्य हे रेखाच्या भूमिकेचे विशेष होते. देहबोली हा तिच्या अभिनयाचा विशेष पैलू होता.
रुद्रापाच्या भूमिकेत होते योगेश बेंद्रे, आपली भूमिका त्यानी चोख बजावली.

इन्स्पेक्टर सूर्यवंशी ची तडफदार व रुबाबदार भूमिका रोमेल पारसनीस ने छान साकारली होती. शहरी पोलीस इन्स्पेक्टर जसा असावा तसाच त्याने सादर केला.

सहायक पोलीसाच्या व्यक्तिरेखा अक्षय साटम ने उत्तमरीत्या साकारली होती. छोटीशी भूमिका असूनही त्याने ती छान अधोरेखित केली.

व्लुमिंग्टन् व्यतिरीक्त सेंट लुईस आणि मिलवॉकी येथेही नाटकाचे यशस्वी प्रयोग झाले.

कार्यक्रमाला खालील स्वयंसेवकानी बहुमोल सहकार्य केले.

कार्यस्थळ व्यवस्था गौरी करंदीकर
नेपथ्य गणेश भदाणे, प्रवीण फेंगाडे, गौरव आणि युगा नारखेडे 
पार्श्वसंगीत नागेश गलपल्ली
नाटक पोस्टर युगंधरा नारखेडे
विशेष सहाय्य अक्षय साटम.गायत्री भदाणे,आरती पाटील, 
फोटोग्राफी पूनम मानकामे 
व्हिडीयो चित्रण राहुल झगडे, शशांक गायकवाड
अल्पोपहार व्यवस्था सिध्दार्थ व पल्लवी खाडे, पल्लवी निकम, अनामिका बेराड
तिकीटविक्री उदय परांजपे, प्रसाद देशपांडे, अनंत गोखले, आशिष डहाके
वृत्तांकन रश्मी गोखले

 

आपले
मराठी मंडळ ब्लूमिंग्टन-नॉर्मल

नाटकाचे पोस्टर     

नाटकाची छायाचित्रे 
कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००