पाडवा

नमस्कार मंडळी,

शनिवार दिनांक १५ एप्रिल रोजी गुढीपाड्व्या निमित्त आपल्या मंडळाची नाट्यपरंपरा कायम ठेवत १६ वे नाटक सादर झाले.

शंन्ना नवरे लिखित आणि गौतम करंदीकर दिग्दर्शित "तळहातीच्या रेषा" हे तीन अंकी नाटक हेडन ऑडिटोरीयम मधे सादर झाले.

रश्मी गोखले यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि नांदी च्या स्वरांनी नाटकाला सुरुवात झाली.
"तळहातीच्या रेषा मांडतात भविष्याचा खेळ
जमतो का खरंच त्याचा आयुष्यात मेळ ?"
या प्रश्नाचा शोध घेणारे अतिशय रंजक आणि उत्कंठावर्धक असे नाटक आपल्या मंडळाच्या गुणी कलाकारांनी अतिशय ताकदीने सादर केले.

कलाकार गौतम करंदीकर, गौरी करंदीकर, मंदार कुलकर्णी, अण्वेश जोशी, विनिता जोशी 
समीर आगरकर, अभिजीत कुलकर्णी, आणि पराग काजरोळकर 
नेपथ्य अमोल होशिंग, प्रवीण फेंगडे, 
पार्श्वसंगीत साईप्रसाद जोशी 
विशेष सहाय्य अक्षय साटम, पूजा साटम 

मध्यंतरात सगळ्यांनी फ्रुटी आणि नाटकानंतर वडा पाव चा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.

फोटोग्राफी केदार कुंचूर 
व्हिडीओ चित्रण राहुल झगडे 
तिकीट विक्री प्रसाद देशपांडे, प्रवीण फेंगडे 
बेबीसिटिंग दीपाली देशपांडे, सीमा मोटवानी, सीमा बेंद्रे,रश्मी गोखले 
अल्पोपाहार व्यवस्था सुशील दुर्वास, सीमा बेंद्रे, प्रसाद देशपांडे
प्रवीण फेंगडे, अमोल होशिंग,आशिष डहाके 

कार्यक्रमाची छायाचित्रे

धन्यवाद!

आपले
मराठी मंडळ ब्लूमिंग्टन-नॉर्मल      




कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००