कार्यक्रम २००० - दिवाळी

“वटवट सावित्री “.

दिवाळीला ब्लूमिंग्टन मराठी मंडळाचे पहिले ३ अंकी नाटक ४ नोव्हेंबरला मेट्कॅफ़ स्कूलच्या हेडन ऑडीटोरियम मधे सादर झाले.

रत्नाकार मतकरी लिखित गौतम करंदीकर दिग्दर्शित “वटवट सावित्री” या नाट्काचे थोडक्यात कथानक असे …नाटक सुरु होते पुण्यातल्या उपनगरातल्या प्राध्यापक पोफळे यांच्या बंगल्यात.प्राध्यापकांच्या प्रथम पत्नीचे निधन झालेले असते….आणि आता प्राध्यापकांनी यामिनी या त्यांच्या विद्यार्थीनीशी लग्न केलेल् असते …हे लग्न यामिनीच्या आईला अजीबात पसंत नसते….यामिनीला भेटायला म्हणुन या “मम्मी” नुकत्याच आलेल्या असतात आणि सतत जावयाशी “तू..तू ..मै..मै.” चालु असतं.त्यांच्या घरी कामाला असणारा फटू….त्यात आणखी भर घालत असतो… त्यातच प्रोफ़ेसर पोफळेंचा मित्र डॉ.एकशिंगे येतात…एका राघोभरारी नावाच्या मांत्रिकाला घेउन येतात.

परलोकातल्या व्यक्तिंशी (आत्म्यांशी) बोलू शकतो असा राघोभरारिचा दावा असतो आणि तो खोटा ठरुवुन एकशिंग्यांना त्याला पोलीसात द्यायचे असते. अंधश्रधा निर्मुलनाच्या या कामात त्यांना पोफळ्यांचे सहकार्य हवे असते.हो नाही करत पोफळे,यामिनी,आणि मम्मी त्यांना मदत करायला तयार होतात…कुणाशी बोलयचय अस विचारताच पोफ़ळे पहिल्या बायकोला बोलवा म्हणतात……राघोभरारीचे मंत्र तंत्र सुरु होतात….आणि पोफळ्यांची स्वर्गवासी प्रथम पत्नी “सावित्री” खरच अवतरते………पण ती फ़क्त पोफ़ळ्यांनाच दिसत असते इतरांना नाही…आणि मग सुरु होते गमतीदार घट्नांची मालिका……फॅन्ट्सीच्या तंत्राने खुलवलेले विनोदी प्रसंग नाटक खुपच मनोरंजक करतात.

मंडळाचे हे पहिले नाटक सेट शिवाय झाले पण कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने ती उणीव फारशी जाणवु दिली नाही….व एक रंगतदार प्रयोग सादर केला

भुमिका        कलावंत
यामिनी       दिपा जोशी
फटु         विशाल डहाळकर
मम्मी       मेधा कदम
प्रा. पोफळे    प्रसन्न माटे
डॉ.एकशिंगे    राजेंद्र भिडे
राघोभरारी     चंद्रशेखर वझे,
सावित्री      गौरी करंदीकर…..
रंगमंच व्यवस्था   गिरीश कदम, अमृत शहा, ब्रम्हदेसम नरसिंहन.
ध्वनिसंकलन   मोहन भिडे,
पार्श्वसंगीत    राहुल शिंदे,
विशेष सहाय्य   माधुरी माटे, विक्रम करंदीकर.

या नाटकाचे शिकागो, मिलवॉकी येथे यशस्वी प्रयोग झाले.

नाटकाचे पोस्टर

कार्यक्रमाची छायाचित्रे