कार्यक्रम २००५

हरिदास संगीत संमेलन आणी ब्लुमिंग्टन नॊर्मल मराठी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने झाली गान सरस्वती... श्रीमती किशोरी आमोणकरांच्या पट्टशिष्या, जयपूर-अंत्रोली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायीका सौ. आरती अंकलीकरांच्या शास्त्रीय गायनाची मैफ़ल. ३ तास रंगलेल्या या मैफिलीमध्ये त्यांनी सुरांच्या बरसातीत श्रोत्यांना अगदी न्हाऊन काढलं. त्यांनी गायलेली गानसंपदा होती – “भीमपलास”, “पुरिया धनश्री”, “दुर्गा”, “श्री”, “मधुकंस” (मराठी गाणं), “मीराबाईचं भजन”, आणि अर्थातच “भैरवी”. या कार्यक्रमात तबल्यावर त्यांची साथ केली होती श्री। रामदास पळसुले यांनी.