मराठी अस्मिता जोपासणारे शिकागोचे अधिवेशन

उत्तर अमेरिकेतील मराठी समाजाला एकत्र आणणारी , त्या समाजाच्या हिताचे विविध प्रकल्प राबवणारी BMM ही North America आणि Canada मधील सर्व मराठी मंडळांना छत्रछाया देणारी Umbrela Organization... आपले मंडळ ही BMM चे सदस्य आहे.या बृहन महाराष्ट्र मंडळाचे १५ वे अधिवेशन नुकतेच शिकागो येथे संपन्न झाले.

या निमित्ताने आपल्या ब्लुमिंग्टनवासीयां साठी BMM ची अधिक माहिती….यंदाच्या अधिवेशनाचे यजमानपद होते शिकागो महाराष्ट्र मंडळा कडे. मंडळ शिकागो हे ४२ वर्षांची परंपरा असलेले उत्तर अमेरिकेतील पहिले मराठी मंडळ! योगायोग असा की उत्तर अमेरिकेतील सर्व मराठी मंडळांसाठी एक संघटीत मंच असावा ह्या उद्देशाने ३० वर्षांपूर्वी BMM म्हणजेच बृहन्महाराष्ट्र.) मंडळाची स्थापनातही महाराष्ट्र मंडळ शिकागोचे कार्यकर्ते कै. शरद गोडबोले, कै. विष्णु वैद्य, आणि सौ. जया हुपरीकर ह्यांच्या पुढाकाराने शिकागोतच झाली. १९८४ साली BMM पहिले अधिवेशन शिकागोत झाले…कॅनडा आणि नॉर्थ अमेरिकेतली सगळी मराठी मंडळी या निमित्ताने एकत्र आली…आणी या नंतर दर दोन वर्षांनी ही अधिवेशने भरवण्याची परंपरा सुरुच राह्यली. यंदा पुन्हा १५ वर्षांनी हे अधिवेशन स्वगृही साजरे झाले. या अधिवेशनाला आजवर महाराष्ट्रातून अनेक ख्यातनाम साहित्यीक, कलाकार, गायक,विचारवंत,समाजसेवक, यांना सन्मानाने आमंत्रीत करण्यात आले आहे… .पु.ल.देशपांडे, ना.ग.गोरे,सुनिल गावसकर, प्रकाश आमटे, अनिल अवचट, माधुरी दिक्षीत, आशा भोसले, जयंत नारळीकर, विक्रम गोखले,सुरेश वाडकर, ही काही नावे वानगी दाखल……

यंदाच्या शिकागो अधिवेशनातही अनेक नामवंतांनी हजेरी लावली…. North America आणि Canada येथील सुमारे चार हजार मराठी मंडळी तिथे जमली होती. ३ दिवस मायमराठीचा जागर ,गौरव, आणि जल्लोष…! जेष्ठ साहित्यिक, शास्त्रज्ञ यांची विचार प्रवर्तक भाषणे ,. महाराष्ट्रातून आलेल्या आणि अमेरिकेतल्या कलाकारांचे नृत्य,नाट्य, संगीत या कलांचे उत्तमोत्तम आविष्कार सादर झाले.

"उद्घाटन सोहळ्यात". प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि शिकागोस्थित ‘अनुपमा धारकर’ ह्यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली "एरी क्राऊन" च्या जगप्रसिद्ध रंगमंचावर साकारला संगीत व नृत्यमय, "प्रवास(The Journey)-मराठी मनाचा"! अपरिचित आणि अनामिका वाटणाऱ्या ह्या अमेरिकेच्या धरतीने आपल्याला आईची माया - छाया दोन्हिही भरभरून दिलं आहे, त्याचीच उब घेऊन मराठी माणूस प्रगतीची वाट चालत राहिला आणि त्याच्या विजयाचे पडघम साऱ्या उत्तर अमेरिकाभर वाजू लागले. तोच ताल आणि नाद घेऊन ह्या इतिहासाला शिकागो आणि परिसरातील ८० पेक्षा अधिक कलाकारांनी जिवंत केलं! या कार्यक्रमात आपल्या सर्वांना परिचीत असलेली अमृता प्रसन्न माटे हिचा सहभाग होता ही उल्लेखनीय बाब. मुंबईहून ९० कलाकारांसह आलेल्या अशोक हांडे यांचा “मराठी बाणा” या अधिवेशनाचे आकर्षण ठरला. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेलीए श्रेयस तळपदे ची मुलाखतही खुपच रंगली. आनंद भाटे (आनंद गंधर्व) आणी मंजुषा पाटील यांच्या “नमन नटवरा” या नाट्यगीताच्या कार्यक्रमाला तर लोकांनी उदंड प्रतीसाद दिला. शंकर महादेवन यांनी एकापेक्षा एक सुंदर मराठी गाणी सादर करुन श्रोत्यांना खुष केले.

त्या बरोबरच अमेरिकेतील स्थानिक कलाकारांनीही अनेक दर्जेदार कार्यक्रम सादर केले.त्यातला सा रे ग म च्या धर्ती वर घेतलेली गाण्याची स्पर्धा “स्वरांगण” आणी समीप रंगमंच उपक्रमातल्या एकांकीका हे खास उल्लेखनीय कार्यक्रम. स्वरांगणच्या final round मधे Peoria ची आरती कुलकर्णी हिचा समावेश अभिनंदनीय..! खर तर सगळेच कार्यक्रम दर्जेदार झाले..भोजन व्यवस्था अतीशय उत्तम .४००० माणसांची एकंदरीतच सगळी व्यवस्था ठेवणे हे अतीशय कठीण काम ..पण हे शिवधनुष्य शिकागो महाराष्ट्र मंडळाने यशस्वीपणे पेलले….त्या बद्दल सर्वच उपस्थीतांकडून प्रश्ंसेचे आणी धन्यवादाचे उद्गगार निघत होते.

या भल्या मोठ्या उत्सवात आपल्या ब्लुमिंग्टन मराठी मंडळातील कलाकारांनीही उत्साहाने भाग घेतला. “पुण्यात शहाजहान” ही fantacy आणि “ वधुपरीक्षेला NRI कोकणात” अशी दोन धमाल skits ब्लुमिंग्टन मराठी मंडळा तर्फे सादर झाली. सचिन मोटे लिखित गौतम करंदीकर दिग्दर्शीत ही दोन्ही स्किट सादर केली अनिरुद्ध गोडबोले, सोनलपरब, अभिजीत नेरुरकर, गौरी करंदीकर आणि गौतम करंदीकर या कलाकारांनी. या अधिवेशनात आपल्या मंडळाचे कलाकार उत्साहाने सामील झाले आणि माय मराठीच्या या दिंडीत त्यांनी आपल्या मंडळाचा झेंडा फडकवत ठेवला याचा मंडळाला सार्थ अभिमान आणि आनंद आहे.

BMM बद्दल अधिक माहिती साठी पहा

सोबत आहेत BMM चे फोटो

आणी मान्यवरांच्या भाषणाच्या links त्या जरुर वाचा. रत्नाकर मतकरी यांचे भाषण

गौरी करंदीकर