दिवाळी धमाका - "दिपोत्सव"

२७ ऑक्टोबरला दिवाळी निमित्त Attractive Alternative Washington St. येथे “दीपोत्सव“ हा धमाकेदार कार्यक्रम झाला.

पुण्याच्या नामवंत कलाकार मंजीरी धामणकर यांनी “चर्पटमंजिरी“ हा एकपात्री धमाल विनोदी कार्यक्रम सादर केला .सुश्राव्य आवाजातले काव्य, रंगतदार विनोदी किस्से, हसतखेळत जीवनावर भाष्य करत हा कार्यक्रम खूप रंगला आणि मनोरंजना बरोबरच श्रोत्यांना अंतर्मुखही करून गेला .

मराठी मंडळाच्या पहिल्या दिवाळी अंकाचे "कलारंग" चे प्रकाशन, मंजिरी ताई धामणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले ..! या अंकाचे संपादन केले आहे सुखदा खोम्बारे यांनी.

यानंतर, मित्रमंडळीं सोबत गप्पा मारत सगळ्यांनी खमंग "दिवाळी फराळ" केला. रांगोळी, आकाशकंदील, पणत्या यांनी कार्यक्रम स्थळ लखलखत होते .
ही सजावट करण्यासाठी खास मेहनत घेतली होती खालील कार्यकर्त्यानी
रांगोळी आणि आकाश कंदील --- श्रुती डहाके , चैताली भाटवडेकर , आरती पाटील, पल्लवी निकम
सजावट आणि लायटिंग --- अनंत गोखले , आशिष डहाके , शिरीष राणे , सुरेश मलन ,
फराळाची व्यवस्था --- सिद्धार्थ आणि पल्लवी खाडे , निलेश आणि अपर्णा जावळकर , गणेश आणि गायत्री भदाणे , पल्लवी निकम, सुखदा खोम्बारे
रव्याचे लाडू बनवले होते गौरी करंदीकर,श्रुती डहाके ,प्रगती प्रसाद ,अपर्णा जावळकर यांनी
सगळ्यांसाठी अमृततुल्य चहा बनवला स्वप्नील आणि दीपिका राउत यांनी.
ध्वनी संयोजन –मोहित पोतनीस, आशिष डहाके, अक्षय साटम

सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद .

कार्यक्रमाचे फोटो


दिवाळी अंक