पसायदान

रविवारी ४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी श्री अरविंद जोशी यांचे "पसायदान" विषयी व्याख्यान श्री गौतम आणि सौ गौरी करंदीकर यांच्या घरी आयोजित करण्यात आले .

श्री अरविंद जोशी यांचा थोडक्यात परिचय असा .. श्री जोशी सेवानिवृत्त बँक अधिकारी असून संस्कृत भाषेचा आणि धार्मिक ग्रंथांचा त्यांचा विशेष व्यासंग आहे. पुण्यात त्यांची गीता , रामचरित्र , व ज्ञानेश्वरी अशा विविध विषयांवर व्याख्याने होत असतात. जोशी यांचे आजोबा आणि वडील संस्कृत चे गाढे विद्वान असून गेली अनेक वर्षे बार्शी येथे "संस्कृत "पाठ शाळा चालवत आहेत. ब्लूमिंग्टनला ते आपली कन्या गीता व जावई योगेंद्र घाटपांडे यांच्याकडे आले असताना हा व्याख्यानाचा योग जुळून आला.

अत्यंत ओघवत्या शैलीत त्यानी प्रथम श्री संत ज्ञानेश्वर यांचे जीवनचरित्र थोडक्यात सांगितले आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज विरचित ज्ञानेश्वरी या ग्रंथातील शेवटच्या -म्हणजेच - १८ व्या अध्यायाचे समापन ज्या पसायदान या प्रार्थनेने होते. या पसायादानाचा भावार्थ त्यानी अत्यंत समर्पक शब्दात कथन केला .

ब्लूमिंग्टनला भेट देणा-या पालकांचे कार्यक्रम आयोजित करण्याची मंडळाची परंपरा याही वर्षी चालू राहिली हे विशेष!

कार्यक्रमाची छायाचित्रे