मराठी चित्रपट
"डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो"

दिनांक ७ डिसेंबरला “Normal Theater” मध्ये "प्रकाश बाबा आमटे –द रिअल हिरो"

या सिनेमाचा शो मंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता. ब्लूमिंग्टन व्यतिरिक्त Peoria, Champaign, Decature, Springfield येथूनही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

गौरी करंदीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रमुख पाहुण्या समृद्धी पोरे यांचा थोडक्यात परिचय करून दिला.

चित्रपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात आणखी बहार आली. चित्रपटानंतर समृद्धी पोरे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली.
या चित्रपटाद्वारे प्रकाश आमटे यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचले त्या बद्दल समृद्धी पोरे यांना मनापासून धन्यवाद! शिकागो येथील पंकज अकोलकर यांनी समृद्धीजींच्या प्रवासाची व्यवस्था पाह्यली त्या साठी त्यांना धन्यवाद .

प्रकाश आमटे यांचे समर्पित जीवन प्रेक्षकाना खूप अंतर्मुख करून गेले. याच वेळी हेमलकसा येथील “लोकबिरादरी“ या संस्थे साठी निधी संकलन करण्यात आला. या fundraising ला आपल्या मंडळाच्या सभासदांनी उत्तम प्रतिसाद दिला. जमा झालेले $1700 Arpan Foundation या संस्थेच्या माध्यमातून थेट लोकबिरादरी प्रकल्पाला पाठवण्यात आले.

कार्यक्रमाला खालील स्वयंसेवकांनी सहकार्य केले त्यांचे विशेष आभार
कार्यस्थळ व्यवस्था --- गौरी करंदीकर, गौरव नारखेडे, सुखदा खोंबारे, पल्लवी निकम

वृत्तांकन
गौरी करंदीकर

कार्यक्रमाची छायाचित्रे