भेळ आईस्क्रीम पार्टी

रविवार दिनांक २६ जुलै रोजी Anderson Park -Normal येथे मंडळाची झकास भेळ आणि आईस्क्रीम पार्टी झाली.

ब्लुमिंगटन मध्ये नव्याने आलेल्या मंडळींची ओळख आणि मायदेशातून आलेल्या पालकांचे स्वागत उद्देशाने हा भेळ पार्टीचा बेत आखला जातो. सुरुवातीला सौ.गौरी करंदीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून मराठी मंडळाच्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.,आणि नवीन मंडळी आणि पालकांनी त्यांचा परिचय करून दिला. सर्वांनी चटकदार भेळेचा आणि आईस्क्रीमचा आस्वाद घेत मस्त गप्पा मारल्या.

सीमा बेंद्रे आणि मंदार कुलकर्णी यांनी सुरेख अभंग गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. लहान मुलांनीही झोपाळा-घसरगुंडी, फुटबॉल खेळून भरपूर मजा केली.

सर्वांचे मनःपूर्वक आभार.

कार्यक्रमाची छायाचित्रे