आषाढी एकादशी

ब्लूमिंग्टन मध्ये आता मंदीर झाले आहे, आषाढी एकादशी निमित्त २७ जुलै रोज्री मंदिरात पांडुरंगाची पूजा आणि आरती करण्याचा नवीन उपक्रम मंडळाने आयोजित केला आणि त्याला सर्व विट्ठल भक्तांनी मनापासून प्रतिसाद दिला.

मंदिराच्या आवारातून पुंडलिक वरदा हारी विट्ठल असा गजर करत, ज्ञानोबा माउली ज्ञानराज माउली तुकाराम या नामघोषात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामाची पालखी मंदिरात नेली.तिथे विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेचे पूजन केले. उत्साहात आरत्या झाल्या. दर्शन आणि प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाची छायाचित्रे