कार्यक्रम २००५ - संक्रांत

संक्रांतीला फकत महिला कलाकारांनी करमणुकीचे कार्यक्रम सादर करायची परंपरा याही वर्षी यशस्वी पणे चालु ठेवत दिनांक १२ फ़ेब्रुवरी रोजी किंग्जले ज्यु. हायस्कूल मधे संक्रात साजरी झाली.

कार्यक्रमाची सुरुवात झाली सुगमसंगीताने......या संगीताच्या कार्यक्रमात गाणी होती, आरती प्रभुंचे ये रे घना..... सौ. रेवा ठाकूर, सुधीर मोघ्यांचे फुलले रे क्षण माझे..... सौ. मानसी जोशी आणि सुरेश भटांचे केव्हा तरी पहाटे..... सौ. आरती कुलकर्णी (पियोरिया). या कार्यक्रमाची सांगता झाली या तिघींनी गीतरामायणाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त गायलेल्या गदिमांच्या राम जन्मला ग सखे..... या अजरामर गीताने. साथसंगत केली होती शैलेश जोशी (सिंथेसायजर), प्रसन्न माटे (तबला) आणि समीर बेंद्रे (गिटार) आणि कार्यक्रमाचे निवेदन केले होते सौ. सोनल पाटील यांनी.

काउंटडाऊन २१ – हे नांव होते यानंतर सादर केलेल्या एकांकिकेचं. ६ ते ६० या वयोगटातल्या १६ भगिनींनी भाग घेतलेल्या या खुसखुशीत एकांकिकेचा विषय होता पति पत्नीच्या नात्यातल्या अपेक्षा आणि त्यातील सुसंवाद. त्याला पार्श्वभूमी होती २१ दिवसात लग्न ठरून अंमेरिकेला निघालेल्या युवतीची आणि लग्नानिमित्त घरी जमलेल्या सर्व साळकाया माळकायांची. मुख्य म्हणजे या एकांकिकेचे लेखन इथे ब्लुमिंग्टनमध्येच झालं होतं ते आणि दिग्दर्शन केलं होतं सौ. अश्विनी देशपांडे यांनी.

यात भाग घेणारे कलाकार होते…….वसुधा दवणे, हेमाताई जोशी ,गौरी करंदीकर, स्वाती हिर्लेकर,नम्रता कुलकर्णी, सोनाली डहाळकर, अंजना भातकांडे, रेवा ठाकुर, दीपा जोशी, आश्लेषा शिंदे, ज्योती शिंदे, ईशा दंडवते, सोनाली परांजपे, पल्लवी परांजपे, निधी किणिकर, आणि अश्वीनी देशपांडे, विषेश सहाय्य वैशाली कारुळकर, सोनाली डिके

नृत्य – यानंतर बहारदार कोळी नृत्यांनी कार्यक्रमाची रंगत आणखीच वाढली. मी डोलकंरं....., पारू ग पारू....., हिल हिल पोरी हिला....., आणि ऐका दाजिबा.....या गाण्यांवर नृत्य बसवली होती. दिग्दर्शन होते सौ. दुलारी ठाकूर यांचं. सहभाग…..दुलारी ठाकुर, मंजिरी पानघंटी, मोनिका गायकेवाडी, वसुधा दवणे, आरती कुलकर्णी, सुवर्णा आडगांवकर, वृषाली थोरात, गीता कदम.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांची मोलाची मदत झाली.. संजय कुरुंदकर, वासुदेव कारुळकर, मयुरेश देशपांडे, समीर बेंद्रे, सुनील मुंडले, अविनाश टकले.


कार्यक्रमाची छायाचित्रे


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००