कार्यक्रम २००९ - संक्रांत


मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
अमेरिकेत रहाणा-या भारतीयांना ही काही नवीन गोष्ट नाही की कोणताही सण आम्ही फक्त वीकएंड लाच साजरा करतो. ह्याच भारतीयांच्या अमेरिकेतील रिवाजा प्रमाणे शनिवार दिनांक १७ जानेवारी २००९ रोजी मकर संक्रांतिचा कार्यक्रम चिडिक्स शाळेच्या सभागृहात पार पडला.

प्रदर्शने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कलाकृतींचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. ब्लूमिंग्टन-नॉर्मल मध्ये असलेल्या ब-याच छुप्या कलाकारांच्या कलेला वाव देण्याकरता २००६ पासून मराठी मंडळातर्फे दर संक्रांतिला अशी कला प्रदर्शन भरवली जातात.या वर्षी एक मोठ्या माणसांचं आणि एक लहान मुलांचं अशी दोन प्रदर्शने होती.

मकरसंक्रांत आणि पतंग यांचा अन्योन्य संबंध आहेच. याला धरूनच लहान मुलांचे किते एक्सप्रेस हे प्रदर्शन आयोजित केले होते. इथे अमेरिकेत जानेवारीत कडाक्याच्या थंडीत पतंग उडविणे जरी शक्य नसले तरी बनविणे शाक्य आहे हा मुद्दा लक्षात घेवून मंडळाने प्रदर्शनात भाग घेतलेल्या प्रत्येक मुलाला पतंग बनाविण्याचे साहित्य पुरविले होते. त्यापासून बाल गोपाळांनी विविध रंगांचे, आकाराचे सजावटीचे सुंदर सुंदर पतंग बनविले होते.

वेगवेगळ्या वयोगटातील तीस मुलामुलींनी या पतंग प्रदर्शनात भाग घेतला होता त्यांची नावे पुढील प्रमाणे : सृष्ठी पाटील, रिया बाजवाला, अनुषा नाडकर्णी, वैदेही पाटील, रमा टोणपे, जय महाजन, ओजस डहाळकर, ऋजुता दुर्वास, मीरा वाघ, मल्हार कमलापूर, सिद्धि गोखले, आदित्य नरसाळे, मृणाल तायडे, मौशमी भट, अर्जुन काळे, राधा वाघ, ईशा गवांडे, अभिरू राउत, वेद लोँबार, ग्रीष्मा राउत, श्रीया मालपाणी, आदित्य खटावकर, सुहृद राउत, गौतम सप्रे, श्रेया जामसंडेकर, मानसी साठे, अलीशा नाडकर्णी, केयूर गोंधळेकर,अक्षय बुचे, सानिका बुचे, सोनल गानू.

कलाकृती २००९ या मोठ्यांच्या प्रदर्शनात स्केचेस, पेंटिंग्स, हाताने बनविलेले दागिने, फुलांची फळांची सजावट, सिरेमिक पेंटिंग्स इत्यादी वेगवेगळ्या कलाकृतींचा समावेश होता. या सर्वांची मांडणी हॉलच्या एका बाजूला रांगेत ठेवली होती. त्याच्या वरच्या बाजूस लहान मुलांचे पतंग लावण्यात आले होते. एकंदरीत ती मांडणी आणि त्यातील कलाकृती इतक्या लक्षवेधी होत्या की ते बघून प्रेक्षकांतून कौतुकाचे शब्द उमटले.

कलाकृती करणारे होते : मंगल नरसाळे, रश्मि मूर्थी, अर्चना नाडकर्णी, बेलिंडा फर्नांडीस, तारका निरंतर, वैशाली मालपाणी, अनुजा दुर्वास, आदिती साठे, स्वाति सप्रे, हर्षिदा हिरानी, प्राची पाटील, गायत्री बिहानी, मंजिरी भागवत.

करमणुकीचे कार्यक्रम या वर्षी करमणुकीच्या कार्यक्रमात गीत-संगीत आणि नृत्य-संगीत असे दोन प्रकार होते. संक्रांत हा मंडळाचा वर्षातला पहिला कार्यक्रम असतो. तेंव्हा नववर्षाचा शुभारंभ करणा-या अशा या कार्यक्रमाची सुरूवात श्री प्रभु रामचंद्रांच्या स्मरणाने, गुणगायनाने झाली, म्हणजेच गीतरामायणाने झाली. आधुनिक वाल्मिकी कविश्रेष्ठ श्री. ग.दि.माडगुळकर यांनी २४००० ते २५००० मूळ रामायणातील श्लोकांचे सार केवळ ५६ गाण्यात बांधून जी गीते रचली त्यांनाच संगीतश्रेष्ठ श्री. सुधीर फडके यांनी स्वरात गुंफून जे निर्माण झालं ते गीत-रामायण होय. संपूर्ण रामायणातील प्रमुख घटनांना अनुसरून एकूण १३ भावगीते या ’निवडक गीत-रामायणात’ गायली गेली. 'स्वये श्री रामप्रभु ऐकती..' या गीताने आरंभ झालेला हा कार्यक्रम नंतर 'दशरथा हे घे पायसदान' , 'राम जन्मला ग सखे', 'स्वयंवर झाले सीतेचे' अशा एकाहुन एक सुरेल गीतानी उत्तरोत्तर रंगत गेला. आजच्या या निवडक गीत-रामायणाचे वैशिष्ठ्य म्हणजे यातील प्रत्येक गीत हे उत्तमरित्या गायले गेले, तसेच त्याला अतिशय योग्य अशी वाद्यवॄंदाची साथ मिळाली आणि तितक्याच उत्तम साउंड सिस्टिम द्वारे हे सर्व प्रेक्षकांपर्यन्त पोहोचविले गेले. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अप्रतीम, रम्य असा हा गीतांचा कार्यक्रम सादर झाला. प्रत्येक गायक-कलाकाराच्या भावपूर्ण गायनाने सर्व प्रेक्षक अगदी मंत्रमुग्ध झाले.

शब्द व स्वरसौंदर्याने नटलेले हे निवडक गीत-रामायण सादर करणारे कलाकार होते : नीलेश ताम्हाणे, मानसी जोशी-सिंग, श्वेता जामसंडेकर, प्रवीण कमलापूर, अनंत गोखले, देवयानी गोडसे, पुष्कराज जहागिरदार, सोनाली सरदेसाई आणि केदार भागवत. पेटीवर सुरांची लय सांभाळत होते प्रसन्न माटे तर तबल्यावर ताल सांभाळला होता प्रवीण कमलापूर यांनी. भारतातून आलेले कलाकार श्री. पुंडलिकराव डहाळकर यांनी एका गीता करिता पेटीची साथ दिली होती. दोन गीता मधील निवेदन करत होत्या रश्मी गोखले व प्राजक्ता कमलापूर. सूचक असे निवेदन लिहिले होते माधुरी माटे यांनी.

निवडक गीतरामायणानंतर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात होता मुजरा मानाचा - मराठी मनांचा हा नॄत्याविष्कार. चित्रपटसॄष्ठीत जसा एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच खूप गाजतो त्याप्रमाणे या कार्यक्रमाला प्रदर्शनापूर्वी हिट अशी प्रसिध्दी मिळाली होती. पूर्वी भारतात टि.व्ही वर छायागीत किंवा चित्रहार असा कार्यक्रम असायचा. त्याच धर्तीवर एक थीम घेऊन त्यावर आधारित गीतनॄत्यांचा असा हा कार्यक्रम होता 'मुजरा मानाचा - मराठी मनांचा'. याची थीम होती - मराठी चित्रपट्सृष्ठीचा ब्लॅक & व्हाईट पासून सुरु झालेला प्रवास व त्यात मराठी सिनेमाचा बदलत गेलेला चेहरा. सन १९४१ साली प्रदर्शित झालेल्या शेजारी या चित्रपटातील लखलख चंदेरी सोनेरी या गाण्यावरील नॄत्याने या नृत्यहाराची सुरुवात झाली. आजच्या जमान्यासाठी अतिशय संथ असलेले हे गाणे केवळ त्यातील प्रभावी नॄत्यरचनेने व साजेशा नेपथ्याने खूप उठावदार ठरले. त्यानंत्र एकापाठोपाठ एक अशी मराठी चित्रपट्सॄष्ठीतील त्या त्या दशकातील हिट गाणी नॄत्याच्या माध्यमातून सादर केली गेली. यात 'लटपट लटपट तुझे चालणे' , 'बुगडी माझी सांडली ग' , 'दिसला ग बाई दिसला' या लावण्या, 'काय ग सखू', 'अश्विनी ये ना' , 'ही नवरी कसली' इत्यादी दुएत गाणी तर ' बांबूच्या वनात' , 'चांद मातला', 'मी आले निघाले' इत्यादी समूहनॄत्यांचा समावेश होता.

आल टाइम फ़ेवरेट असलेल्या तब्ब्ल १४ गाण्यांवर नॄत्य बसविण्यात आले होते. रेकोर्ड डान्स हा हल्ली काही नवीन प्रकार नाही.पण प्रत्येक जमान्यातील विविध पध्दतीची गाणी व त्यावर तितकीच साजेशी कलाकारांची नृत्यशैली बघून प्रेक्षक सानंद चकित झाले. प्रत्येक गाण्यातील फक्त नृत्यरचनाच नाही तर वेशभूषा आणि इतर नेपथ्य याने प्रत्यक्ष तो माहोल उभा केला गेला होता. अक्षरश: प्रत्येक गाण्याला टाळ्या आणि शिट्या वाजवून प्रेक्षकांनी दाद दिली. 'अश्विनी ये ना" मधला सुनील मुंडलेंचा अशोक सराफ आणि 'काय ग सखू' मधला सुदर्शन पलांडे यांनी सादर केलेला दादा कोंडके अगदी हुबेहुब ठरला. अर्थात सर्वच कलाकारांनी इतकं आकर्षक नॄत्य केलं की कार्यक्रम संपला तरी प्रेक्षकांच्या टाळ्या आणि वन्स मोअरच्या घोषणा काही संपत नव्ह्त्या. शेवटी कार्यक्रम संपण्याची वेळ टळून गेली असूनही केवळ प्रेक्षकांच्या विनंतीला मान देवून मोजकी ५ गाणी परत सादर करण्यात आली. या नॄत्यहाराची मूळ संकल्पना होती गौरी करंदीकर यांची. या कल्पनेला नृत्यरुपाने सादर करणार्या नॄत्यदिग्दर्शिका होत्या सोनल परब. सहाय्यक नृत्यदिग्दर्शक होते आशिष दहाके. नॄत्यदिग्दर्शनाबरोबरच सोनल परब यांनी गाण्यांची निवड, त्यांची मांड्णी, क्रम, वेशभूषा, नेपथ्य या जबाबदा-याही पार पाडल्या. 'मुजरा माना..' चे वैशिष्ठ म्हणजे आतापर्यंत सादर झालेल्या मंडळाच्या नॄत्यसंगीतात २७ कलाकारांच्या संचाने नृत्य सादर करण्याची ही पहिलीच वेळ.

हे लाजबाब नॄत्यकलाकार होते : सोनल परब, कविता अमृतकर, पल्लवी मुंडले, श्रेया देसाई, तारका निरंतर, बेलिन्डा फर्नांडीस, वर्षा धुमाळ, अश्विनी देशपांडे, मंजिरी भागवत, रश्मी गोखले, श्वेता सोनी, मानसी बाजवाला, तॄप्ती शिंपी, रत्ना पांगारकर, प्रीती पाटील, अमोल परब, अनंत गोखले, साइश प्रकाश, सुनील मुंडले, निनाद वैद्य, सुदर्शन पलांडे, समीर विजयवर्गीय, अशिश दहाके, अनिरुध्द गोडबोले, मनिष निरे, सागर पाटील, केदार भागवत. दोन नॄत्यामधील निवेदक होते अमॄता आणि पुष्कराज जहागिरदार तर निवेदनाचे लेखन केले होते अश्विनी देशपांडे यांनी.

यावर्षीपासून आपले मराठी मंडळ 'मराठी ग्रंथालय' हा एक नवीन उपक्रम सुरु करत आहे. या संबंधी सविस्तर माहिती मंडळाचे विश्वस्त गौतम करंदीकर यांनी मध्यंतरात दिली. प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांनी या पुढे पडणा-या मराठी मंडळाच्या पावलाचे स्वागत केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन केले होते आश्लेषा राऊत यांनी.

कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यामागे स्वयंसेवकांचे फार मोठे योगदान असते. या वर्षीचा कार्यक्रम यशस्वी करणारे कार्यकर्ते होते :

विशेष सहाय्य : अर्चना नाडकर्णी, वैशाली मालपाणी.

सभागृह व्यवस्था : आदिती साठे

तिळगूळ बनविणे : अर्चना नाडकर्णी, आदिती साठे, रश्मी गोखले, तारका निरंतर, प्राची पाटील.

हळदी-कुंकु : मंगल नरसाळे, गायत्री रामदासी, भाग्यश्री महाले, स्वप्ना प्रसादे, सोनाली पाटील

कलाप्रदर्शन संकल्पना : आदिती साठे, अनुजा दुर्वास.

कलाप्रदर्शन सहाय्य : शिल्पा वाघ.

तिकीटविक्री : अभी शेंडे, सुनील मुंडले, नितिन महाजन , गौतम करंदीकर, अनंत गोखले, शिवप्रसाद केसरे, श्रीनिवास साठे , कुणाल लाड , सचिन टकले , आत्माराम जोशी, चंद्रजीत पाटील , अभिजित नेरुरकर, मानसी राक्षे, पंकज शाह, उदय परांजपे, निखिल जोशी, मंदार कुलकर्णी, लक्ष्मण चौधरी, विशाल रविंद्र पाटील, युवराज सोनावणे, अमित वाडेकर, पल्लवी मुंडले, अश्विनी देशपांडे

भोजन व्यवस्था : मेधा राजगुरु, संगीता किणीकर, वैशाली मालपाणी, अनिता देऊसकर, अक्षता कामत, अभिजित नेरुरकर, मयुरेश देशपांडे, नितिन महाजन, नैनेश गानू, मंदार कुलकर्णी, रोमेल पारसनीस, मकरंद कुरुंदकर, बाळ्कृष्ण कामत, उमेश बिहानी, उदय परांजपे, सचिन बुचे.

फोटोग्राफी : रोहन गुर्जर

ध्वनीयोजना : मोहित पोतनीस, शिव केसरे, समीर बिल्डिकर, नितिन महाजन

वरील सर्व मंडळींचे आभारप्रदर्शन झाल्यानंतर तिळगूळ व वाण देउन आणि भोजनाने या संक्रांत कार्यक्रमाची सांगता झाली.

- आश्लेषा राऊत

कार्यक्रमाची छायाचित्रे


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००