कार्यक्रम २०११ - संक्रांत



नमस्कार मंडळी,

कडाक्याच्या थंडीत, मराठी संस्कृतीतील कलागुणांना वाव देणारा नूतनवर्षातील पहिला कार्यक्रम ''मकरसंक्रांत'' १५ जानेवारी रोजी वॉशिंगटन एलीमेंटरी स्कूल मधे उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रवेशद्वाराशीच तिळगुळ, हळदीकुंकु व वाण देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. यंदा वाण होते खास महाराष्ट्रीयन दागीना “नथ”.

गौरी करंदीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच आपल्या तडफदार वाणीने आणि रंगतदार वक्तृत्वशैलीने कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली.

यंदाचे प्रमुख आकर्षण होते सुपरहिट गाण्यांचा आणि धमाकेदार नृत्याचा कार्यक्रम “झंकार''!!!

कार्यक्रमाच्या सुरुवातीला '' नटरंग उभा ललकारी नभा'' हे नमन सादर करून मंदर कुलकर्णी, राजेश चलमव अनंत गोखले यांनी सुंदर वातावरण निर्मिती केली.

Karaoke Tracks च्या साथीने गाणे व नवीन पिढीतील संगीतकारांची गाणी हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वैशीष्ठ्य होते. याची मूळसंकल्पना... गौरी करंदीकर यांची... ती यशस्वीपणे साकार केली “झंकार” चे दिग्दर्शक-- राजेश चलम यांनी ..... सर्व गायकांना त्यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.

तसेच तांत्रिक जबाबदारी स्वाती चलम यांनी सांभाळली.

गौरी सरदेसाई ब्लूमिंग्टनला पूर्वीपासून लाभलेली सुरेल गायिका त्यांनी आपल्या खास स्वरसौंदर्याने ''फुलले रे क्षण’’ हे सदाबहार गीत सादर करून रसिकांची दाद मिळवली.

आपल्या गाण्याने सर्वश्रुत असलेल्या अनंत गोखले यांनी प्रेक्षकांना ठेका धरायला लावणारे उडत्या चालीचे गाणे "वाऱ्यावरती गंध पसरला" सादर केले.

''नभं उतरू आलं'' ही आव्हानात्मक रचना आपल्या खड्या आवाजात देवयानी गोडसे यांनी कोरसच्या साथीने स्मरणीय केली व गौरी करंदीकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना या karaoke track वर गाताना मजा आली याची पावतीही दिली.

आपल्या अभिनय कौशल्याने प्रसिद्ध असलेल्या मंदार कुलकर्णीने संगीत क्षेत्रातली आपली सुरुवात वन्समोअर "डौल मोराच्या मानचा"घेतया गाण्याने करून रसिकांची मने जिकंली.

किशोर कुमार यांच्या गाण्यासाठी प्रसिद्ध असलेले राजेश चलम व तितक्याच ताकदीने आव्हान पेलणाऱ्या अजिता खांडेकर यांनी आपल्या रॉकिंग आवाजात "अश्विनी ये ना" हे गाणे गाऊन रसिकांची once more सहीत दाद मिळवली.

लावणी हा अभिजात लोकसंगीत कलाप्रकार, आपल्या अस्सल गावरान, मराठमोळ्या शैलीने "चला जेजुरीला जाऊ" गाऊन शिल्पा वाघ यांनी तर आपल्या ठसकेबाज नृत्याने स्वरूप कांबळे यांनी सादर केला.

गेली अकरा वर्षे ब्लूमिंग्टनच्या मातीशी ऋणानुबंध असलेल्याशिल्पा लोम्बर आपल्या व्यावसायिक गुणांनी ओळखल्या जातातच, तर आज सुमधुर आवाजाने "रुपेरी वाळूत" गाणे सादर करून त्यांनी नवीन ओळख प्रस्थापित केली.

राजेश चलम यांनी आर्तेतेने नटरंग चित्रपटातील ''खेळ मांडला'' हे गाणे सादर करून कुणालाच नशिबाशी असलेला संघर्ष चुकला नाही हेअंतर्मनात जाणवून दिले. याही गाण्याला रसिकांनी जोरदार once more नी दाद दिली

मध्यंतरात अभिजित नेरुरकर यांनी आजच्या कार्यक्रमाच्या स्वयंसेवकांचे आभार मानले, तसेच जुलै २०११ मध्ये शिकागो येथे होणाऱ्या बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाची रूपरेषा सांगितली.

नृत्याविष्काराने कार्यक्रमाच्या उत्तरार्धाची सुरुवात झाली. "जांभूळ पिकल्या झाडाखाली" हे झकास समूहनृत्य सादर केले. मीनल गुर्जर, अनुराधा गोडबोले, सोनाली डहाळकर, रीटा बायस, तृप्ती शिंपी, गायत्री बिहाणी. नृत्य दिग्दर्शन मीनल गुर्जर यांनी केले होते.

|| विद्या विनयेन शोभते || या सुभाषिताची प्रचीती देणारे अवधूत नाडकर्णी सर्वांनाच परिचित आहेतच. "हे चिंचेचे झाडं" हे चिरतरुण गाणे, सादर करून आपल्या व्यक्तिमत्वाचा अजून एक पैलू त्यांनी आज उलगडला आणि रसिकांची दाद मिळवली.

आईशप्पथ....! या चित्रपटातील "दिस चार झाले मन" हे गाणे वन्समोअर मिळवत गौरी सरदेसाई यांनी सादर केले.

"कधी तू...." आणि "गालावर खळी" या लोकप्रिय गाण्यांची मेडली राजेश चलम यांनी प्रस्तुत करून पुन्हा एकदा रसिकांची मने जिंकली. "संधीकाली या अशा" हे अजरामर भावगीत आपल्या सुमधुर आवाजाने सादर करून देवयानी गोडसे व अनंत गोखले सर्वांना वेगळ्याच भावविश्वात घेऊन गेले.

अजिता खांडेकर यांनी आपल्या अविट गोड आवाजाने "आयुष्यावर बोलू काही" फेम सलील कुलकर्णी आणी संदीप खरे यांची ''राती अर्ध्या राती'' ही रचना सादर करून वन्समोअर मिळवला आणि प्रेक्षागृह दणाणून टाकले.

''यंदा कर्तव्य आहे'' या चित्रपटातील "आभास हा" हे गाणे राजेश चलम आणि गौरी सरदेसाई यांनी सादर करून कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली...

तरुण पिढीला आवडणारे गावरान बोली भाषेतील झकास "ढिपाडी डिपांग" हे गाणे सादर करून मंदार कुलकर्णी व शिल्पा वाघ यांनी धमाल केली, तर तरुणाईने तालावर नाचून आणि शिट्या मारून दाद दिली.

कुलदीप शर्मा, रोहित मनुजा, अनिरुद्ध गोडबोले, आशिष डहाके, महेश पुजारी,श्रेयस गोकोडीकर आणि श्वेताश्री मुखर्जी या सळसळत्या तरुणाईने "ये गो ये ये मैना" गाण्यावर रापचिक, धमाकेदार समूह नृत्य वन्समोअर मिळवीत सादर केले. कुलदीप शर्मा यांनी नृत्यदिग्दर्शन केले होते.

शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर ज्याचा ऊर अभिमानाने भरून येत नाही आणि पानिपताचे नाव घेताच ज्याला दु:खाने हुरहूर लागत नाही, तो मराठी मनुष्यच नव्हे! योगायोग असा की जानेवारी २०११ ला पानीपतच्या लढाईला २५० वर्षे पूर्ण झाली…त्या रणावर धारातीर्थी पडलेल्या अनाम वीरांचे स्मरण करुन हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांना .. स्वातंत्र्यवीर सावरकर रचीत ''हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा'' हे गीत सादर करुन .... सर्व गायकांनी केला भावपूर्ण मानाचा मुजरा..

करमणुकीच्या कार्यक्रमानंतर सर्वांनी एकमेकांशी हितगुज करत स्वादिष्ट आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपले मराठीजन अगदी मनापासून कष्ट घेतात हे ब्लूमिंग्टन नॉर्मल मराठी मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमातूननेहमीच जाणवते.

आजच्या यशस्वी कार्यक्रमाचे स्वयंसेवक होते.........

कार्यक्रम संयोजन अर्चना नाडकर्णी
कार्यस्थळ व्यवस्था गौरी करंदीकर, मनिष लिमये, नैनेश गानू
ध्वनी संयोजन मोहित पोतनीस
सजावट अनुजा दुर्वास, रश्मी गोखले
हळदीकुंकु वैशाली कस्तुरे, रती पेडणेकर,नागेश्वरी कल्याणकर
तीळगूळ वडी विभा महाजन,निवेदिता कुलकर्णी, चेतना शेंडे, अनुजा दुर्वास,
अनुराधा गोडबोले, रश्मी गोखले, गौरी करंदीकर
तिकीटविक्री अभी शेंडे, अनंत गोखले , निवेदिता कुलकर्णी, गौरी करंदीकर
भोजन व्यवस्था अर्चना नाडकर्णी,शिल्पा खापरे, निवेदिता कुलकर्णी, अपर्णा इदाते, श्वेताश्री मुखर्जी, पूनम शेष, आशीष डहाके, चेतना शेंडे, अभि शेंडे, राजेंद्र जोशी, सुनिता जोशी, सचिन, बुचे,तेजस्वीनी बुचे, मनिष लिमये, नैनेश गानू, भोजन व्यवस्था विशेष उल्लेखनीय - सर्व छोटे चमू
छायाचित्रकार रोहन गुर्जर ,अनुजा दुर्वास
विशेष सहाय्य हेमंत कुलकर्णी,फणीन्द्र केतकर, अमित शेष, मिलिंद लोंबर

कार्यक्रमाची छायाचित्रे

---रश्मी गोखले---