संक्रांत

संक्रांत - २०१३

संक्रांत - २०१३ मधील मराठी मंडळाचा पहिला कार्यक्रम

दिनांक १७ फेब्रुवारीला  Attractive Alternative येथील सभागृहात मोठया उत्साहात  संक्रांत साजरी  झाली  . मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सर्वांचे तिळाची वडी देऊन स्वागत करण्यात आले. तसेच स्त्रियांसाठी महाराष्ट्राची परंपरा असलेले  संक्रांतीचे हळदीकुंकूही ठेवण्यात आले  होते .   'बुगडी' हा खास दागिना  वाण म्हणून  देण्यात आला. यानंतर करमणुकीच्या कार्यक्रमांची सुरुवात सूत्रसंचालक गौरी कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करून केली.
 
या वर्षी भारतीय चित्रपट सृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने ‘चित्रशताब्दी’ही संकल्पना घेऊन विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. सर्वप्रथम ईशान नेरुरकर  यांनी गिटारवर एक लोकप्रिय गीत सादर केले .  अंकुश मुखेडकर , गौरी कुलकर्णी , नेहा जोशी , सत्यजित शहा   यांनी जुन्या आणि नवीन चित्रपटातील काही लोकप्रिय गीते गायली.

पुढचा कार्यक्रम होता मराठी चित्रपट सृष्टीवर आधारित एक प्रश्नमंजुषा.  Jeopardy या सुप्रसिद्ध मालिकेच्या कल्पनेवर आधारित मराठी चित्रपटांवरील एक प्रश्नमालिका तयार करण्यात आली. ३ स्पर्धकांचा एक असे तीन गट करण्यात आले. मराठी चित्रपटांच्या १०० वर्षांच्या वाटचालीवरील हा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम मनोरंजकच नाही, तर जुन्या नवीन कलाकारांच्या कलेला उजाळा देणाराही ठरला. या कार्यक्रमाचे संचालन केले श्री. अभिजित नेरुरकर ह्यांनी आणि त्यांना सहाय्य केले सौ. अनुजा दुर्वास यांनी.  भाग घेणारे स्पर्धक होते –  सुखदा खोंबारे, चैताली भाटवडेकर, सचिन पानस्कर  (प्रभात गट  ), अदिती दळवी, कांचन दामले आणि सुशील दुर्वास (जयप्रभा गट ), लीना ठोंबरे, मुक्ता कुलकर्णी,मोहित पोतनीस (राजकमल गट ) . विजेता ठरला “प्रभात” गट

यानंतरचा कार्यक्रम होता नृत्याविष्कार. अगदी १९३० सालापासून ते १९९० सालापर्यंतच्या अनेक लोकप्रिय आणि त्या त्या वेळच्या पिढीवर एक छाप पडणाऱ्या गाण्यांवर आधारित चित्रहार हा कार्यक्रम. प्रत्येक काळातील विशिष्ट नृत्यशैलीवर भर देत गाणी सादर करून कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. आयुष्यातील खऱ्या जोडीदाराबरोबर चित्रपटांवरील गीतांवर नृत्य सादर करून हा कार्यक्रम काही  कलाकारांनी अधिकच जिवंत केला. ही कलाकार मंडळी होती , सोनाली कर्णिक , दीप्ती तावरे , तन्वी कासार डोळ, संदीप गायकवाड , श्रध्दा आणि अंकुश मुखेडकर, रेश्मा आणि गणेश अनभुले , श्रुती आणि आशिष डहाके , कल्याणी आणि नागेश गालपल्ली, अंजली आणि राहुल उपाध्याय , तृप्ती आणि कार्तिक . चित्रहाराच्या या भागाच्या  नृत्यदिग्दर्शिका होत्या तृप्ती देशपांडे.

 १९९० ते २०१३ या काळातील गाण्यावर आपल्या बिनधास्त आणि जर हटके शैलीने नृत्य सादर केले कुलदीप शर्मा ,दीपक माहेश्वरी , संदीपकुमार सिंग , हेमंत कागले , वेंकटेश्वरराव  मुसला, गणेश अनभुले  यांनी आणि नृत्य दिग्दर्शन केले होते कुलदीप शर्मा यांनी.
 
कार्यक्रमाची सांगता सूत्रसंचालिका गौरी कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानून केली. कार्यक्रमानंतर सर्वांना "Boxed Dinner "देण्यात आले. गूळपोळी-तूप, ठेपले-लोणचे , डाळवडा आणि पुलाव असा खास मेनू ठेवण्यात आला होता. 

हा कार्यक्रम यशस्वी होण्यात ज्या स्वयंसेवकांचा हातभार होता ते होते :--


कार्यस्थळ  व्यवस्था

गौरी करंदीकर ,  शिरीष राणे , सुरेश मलन

कार्यक्रम व्यवस्थापक( coordinator)

निवेदिता कुलकर्णी आणि अनुजा दुर्वास 

तिळगूळ

निवेदिता कुलकर्णी ,कांचन दामले , चैताली भाटवडेकर ,गौरी करंदीकर

हळदी कुंकू

पल्लवी खाडे ,  दिपाली देशपांडे , अपर्णा जावळकर

ध्वनी ,पार्श्वसंगीत

धनंजय कुलकर्णी  आशिष डहाके ,मोहित पोतनीस

भोजन व्यवस्था

श्वेताश्री म्हसे, विनोद म्हसे, सिद्धार्थ खाडे, समीर आगरकर , शर्मिला आगरकर ,अनंत गोखले , इंद्रायणी मिर्गे,गणेश भदाणे ,सुबोध दामले ,स्वप्नील राउत

फोटो /व्हिडीओ 

स्वनील राउत ,  प्रसाद राजाराम

तिकीटविक्री

गौतम करंदीकर, , उदय परांजपे

वृत्तांकन
कांचन दामले

कार्यक्रमाची छायाचित्रे

व्हीडीओ गॅलरी