संक्रांत - २०१५ 

आपल्या मराठी मंडळाचा २०१५ या नवीन वर्षातील पहिला कार्यक्रम संक्रांत One Normal Plaza,community center मध्ये १७ जानेवारीला दणक्यात साजरा झाला.

गरमागरम मसाला चहा  आणि तिळाची वडी देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.. स्त्रियांसाठी हळदी-कुंकू आणि वाण म्हणून "कुयरी” देण्यात आली.

यंदा संक्रांतीच्या कार्यक्रमात आपल्या सभासदांच्या कलाकृतींचे एक सुंदर "कलाप्रदर्शन" आयोजित करण्यात आले होते. अप्रतीम स्केचेस , पेंटिंग्स, फोटोग्राफ्स, विणकाम,ग्लास पेंटींग्ज,  अशा एकापेक्षा एक सरस कलाकृतींनी हे प्रदर्शन लक्षवेधी ठरले.

पूनम मानकामे , तन्वी डोळ, शिल्पा पोतनीस , अमृता गुप्ते , प्रभाकर भोसले , शर्मिला शहा , श्रुती डहाके , वंदना बाजीकर , पल्लवी निकम , लिडिया शेगांवकर या कलाकारांनी आपल्या कलाकृती ठेवल्या होत्या. तसेच बालकलाकार होते  वेद लोंबर , ऋजुता दुर्वास , प्रिया जोशी , मिहीर बेंद्रे , स्निग्धा गरुड , तन्वी शेगावकर

कलाप्रदर्शनाचे संपूर्ण नियोजन केले होते रश्मी गोखले , अनुजा दुर्वास आणि युगंधरा नारखेडे यांनी.

या नंतर सुरु झाली चित्रपट संगीतांच्या सुवर्णकाळाची सुरेल सफर. कलाकार होते श्री राजेश चलम आणि सीमा बेंद्रे. राजेश  आणि सीमा  यांच्या  सुरेल आवाजाने श्रोत्यांना अगदी मंत्रमुघ्ध केले.

मंदार कुलकर्णी यांच्या नर्मविनोदी खुसखुशीत निवेदनाने कार्यक्रमात आणखी रंग भरला गेला . संपूर्ण कार्याक्रमाची ध्वनीव्यवस्था सौ.स्वाती चलम यांनी अत्यंत कुशलतेने सांभाळून कार्यक्रम रसिकांपर्यंत उत्तम प्रकारे पोहोचवला. या रंगतदार कार्यक्रमाला प्रेक्षकांनीही  टाळ्या, शिट्ट्या आणिonce more चा  गजर अशी  उस्फुर्त दाद दिली. 

कार्यक्रमानंतर सगळ्यांना Box Dinner देण्यात आले. संक्रांतीचा खास मेनू गुळाची पोळी आणि साजूक तूप या भोजनातील विशेष पदार्थांचा सर्वांनी आस्वाद घेतला.

कार्यक्रमाला खालील स्वयंसेवकानी बहुमोल सहकार्य केले.
 

चहा /कॉफी  गौरव नारखेडे, रश्मी गोखले, गौरी करंदीकर
भोजन व्यवस्था अनंत गोखले, सिद्धार्थ खाडे, पल्लवी खाडे, प्रसाद देशपांडे, सुशील दुर्वास, आशिष डहाके, प्रवीण फेंगाडे
हळदीकुंकू प्रियांका मानेकर, मयुरी कुलकर्णी, निधी किणीकर
फोटो गौरव नारखेडे, अनुजा दुर्वास, श्रेयस खर्द
तिकीट विक्री गौतम करंदीकर
कार्यस्थळ व्यवस्था गौरी करंदीकर

आपले

मराठी मंडळ ब्लूमिंग्टन-नॉर्मल

कार्यक्रमाची छायाचित्रे

व्हीडीओ गॅलरी