संक्रांत

2019 मधील मंडळाच्या पहिला कार्यक्रम संक्रात २ फ़ेब्रुवारीला संपन्न झाला. तीळगूळ,हळदीकुंकू,वाण आणि गरमागरम कॉफी ने सर्वांचे स्वागत करण्यात आले.

लहान मुलांसाठी होते त्यांच्या आवडीचे बोरनहाण.

तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे सांगत संक्रात येते म्हणूनच यंदा मित्रमंडळींबरोबर गप्पांचाच कार्यक्रम ठेवला होता.

"चला दोस्त हो बोलू काही " --या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले गौरी करंदीकर यांनी आणि सहभागी झाले होते मंदार कुलकर्णी, गणेश अनभुले, समीर आगरकर, अक्षय साटम, सीमा बेंद्रे,वल्लरी आणी अन्वेश जोशी, विनोद म्हसे, अनंत गोखले,अभिजीत कुलकर्णी.

1 मंडळातला तुमचा प्रेक्षक म्हणून पहिला कार्यक्रम ? 2 कलाकार म्हणून पहिला कार्यक्रम ?
3 स्टेजवर किंवा backstage आयत्या वेळी झालेली अनपेक्षित घटना त्या मुळे कायम आठवणीत राह्यलेला कार्यक्रम
4 मंडळात volunteering केलं त्याचा एखादा अनुभव
5 आम्हाला कुणाला माहीत नाही असे तुमचे काही छंद /कला
6 मंडळ नसते तर....?. 7 मंडळ आहे त्या मुळे.....
8 ब्लूमिंगटनला आल्यावर भेटलेली पहिली मराठी व्यक्ती?

गौरी करंदीकर यांनी विचारलेल्या या प्रश्नांना उत्तरे देताना सगळेच मनापासून भरभरून बोलले आणि मंडळाचा १९ वर्षांचा प्रवास उलगडत गेला, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

नंतर अर्थातच खमंग जेवण होते. मिसळ पाव,अननसाचा शिरा, व्हेज पुलाव.

सगळ्यांच्या सहकार्याने मंडळाचा कार्यक्रम तर छान झालाच पण त्याबरोबरच मराठी मंडळातर्फ़े तर्फे देवळासाठी $900 जमा करू शकलो.

Big thanks to all our volunteers: रश्मी आणि अनंत गोखले, अदिती दळवी, प्रणाली आणि रोमेल पारसनीस, सीमा बेंद्रे, वंदना बाजीकर, अपर्णा इदाते, समीर आगरकर, अक्षय साटम, प्राजक्ता आणि केदार कुलकर्णी, गौरव चौक, सागर पाटील, आनंद रोटकर, सचिन किर्दंत,अर्चना मंगरूळकर, अस्मिता राऊत, अन्वेश जोशी, गौरी आणि गौतम करंदीकर, श्रद्धा जोशी.

कार्यक्रमाची छायाचित्रे

धन्यवाद

आपले

मराठी मंडळ ब्लूमिंग्टन-नॉर्मल